शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मोरणा उपसा बंदीस तात्पुरती स्थगिती

By admin | Updated: January 15, 2016 00:19 IST

शिराळ्यात आनंदोत्सव : शेतकऱ्यांच्या आंदोलनास यश

शिराळा/सागाव : मोरणा धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी, पाण्याची उपसाबंदी तातडीने उठवावी, या प्रमुख मागणीसाठी शिराळा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने उपसाबंदी आदेशाला स्थगिती दिली आहे.२०११ च्या शासनाच्या आदेशानुसार पाणी वापराचा पहिला हक्क पिण्यासाठी, नंतर शेतीसाठी व शेवटी उद्योगासाठी असताना, या नियमांचे उल्लंघन शासनाने केले आहे. शेतकरी वाकुर्डे योजनेचे वीज बिल भरत आहेत, मात्र उद्योजकच पाणी वापरत आहेत. त्यांच्याकडूनही वाकुर्डे योजनेच्या पाणी वापराचे वीज बिल घेण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलकांशी चर्चा करून प्रशासनाने मोरणा धरण लाभक्षेत्रातील पाणी उपसाबंदी उठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.सत्यजित देशमुख यांनी, पाण्यावर पहिला हक्क श्ेतकऱ्यांचा आहे. पाणी कमी पडल्याने याठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. शासनाने डोळ्यास पट्टी बांधली आहे. त्यांना दुष्काळ दिसत नाही, असे सांगितले.यावेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील, ‘विराज’चे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, भानुदास पाटील, आंदोलनकर्ते अशोक पाटील, बाळासाहेब पाटील, अशोक पांडू पाटील, रमेश पाटील, मोहन पाटील, शिवाजी राऊत, बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, संचालक प्रदीप कदम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)कारखाने बंद ठेवूमाजी आमदार नाईक यांनी सांगितले की, पिके वाळू लागली आहेत. पिण्यास पाणी कमी आहे. मात्र कारखानदारांना पाणी चालू आहे. यामुळे प्रथम शेतकऱ्यांना पाणी द्या. जर पाणी कमी पडत असेल तर आम्ही कारखाने बंद ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.