शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँक मासिक ठेव परत देणार

By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST

भारती पाटील : संचालकांच्या बैठकीत प्रस्ताव तयार

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेकडून समासदांच्या वर्गणीतून कपातीची मासिक १६ कोटीची कायम ठेव रक्कम परत देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सहकार विभागाकडे सादर केला आहे, अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा भारती पाटील यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली. नूतन वर्षानिमित्त सभासदांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्व निर्णय घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की, चार दिवसांपूर्वी संचालक मंडळाची बैठक घेतली. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सभासदांना पुरवठा केल्या जाणाऱ्या आकस्मिक कर्जावरील अर्धा टक्का व्याजदर कमी केला आहे. कर्जदार सभासद मृत झाल्यास त्याच्या कर्जाचा बोजा जामीनदार वा वारसदार यांच्यावर राहणार नाही. यामध्ये सहा लाखापर्यंत सूट दिली जाणार आहे. १५ लाखापर्यंतच्या कर्जासाठी विमा कंपनीशी करार झाला असून, तो ऐच्छिक आहे. यासाठी लाखाला ४४ रुपये हप्ता असल्याने १०० टक्के कर्ज माफ होईल. सभासदांची मागणी व अडचण लक्षात घेऊन बिगर जामीनदार आकस्मिक कर्ज ५० हजारावरुन लाखापर्यंत करण्यात आले आहे. गत संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. तरी या पाच वर्षात विद्यमान संचालक मंडळाने टप्प्या-टप्प्याने ही रक्कम भरली आहे.यावेळी समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, शशिकांत भागवत, महेश शरनाथे, बाबा लाड, सयाजीराव पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोळपेंकडून वसुलीभारती पाटील म्हणाल्या की, गत पंचवार्षिक निवडणुकीत चुकीची माहिती देऊन शासन व सभासदांची फसवणूक केलेल्या थोरात गटाचे जगन्नाथ कोळपे यांचे संचालकपद रद्द केले आहे. त्यांनी विविध सुविधांच्या माध्यमातून घेतलेल्या साडेचार लाखांच्या वसुलीची कार्यवाही सुरु केली आहे.