शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव नगरपालिका विरोधक बेभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

तासगाव : नगरपालिकेतील चार वर्षांचा कारभार नागरिकांतून रोष निर्माण करणारा ठरला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यात ...

तासगाव : नगरपालिकेतील चार वर्षांचा कारभार नागरिकांतून रोष निर्माण करणारा ठरला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यात विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अपयश आले. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या रोषाला सामोरे कोण आणि कोणते मुद्दे घेऊन जायचे, असा प्रश्‍न नेत्यांसमोर आहे. पालिकेतील राष्ट्रवादीचा विरोध बेभरोशाचाच राहिला आहे, तर सत्ताधाऱ्यांची कामगिरी खासदारांच्या भरोशावर सुरू असल्याचे चित्र आहे.

तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मिळालेल्या कोट्यवधी रुपयांतून स्वत:चे कोटकल्याण करण्यातच सत्ताधारी कारभारी मश्गूल राहिले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा पालिकेत निघणारे टेंडर आणि ठेकेदार यावरच बहुतांश नगरसेवकांचा वॉच राहिला. ठेका आणि टक्का यापलीकडे पालिकेत काही कामकाज असते का, असा प्रश्‍न उपस्थित व्हावा, असाच कारभार गेल्या चार वर्षांत सुरू आहे. सामान्य जनतेच्या कामांची सर्व भिस्त प्रशासनावर ठेवून मिळालेला निधी खर्ची टाकण्याच्या नियोजनातच सत्ताधारी मश्गूल राहिले.

सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर वास्तविक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून अंकुश ठेवला असता तर राष्ट्रवादीला नागरिकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण करता आली असती. यापूर्वीच्या सभागृहात एक, दोन संख्याबळ असूनही सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करून बेकायदा कामे हाणून पाडल्याचा इतिहास आहे. मात्र यावेळच्या सभागृहात आठ नगरसेवक असूनदेखील राष्ट्रवादीची कामगिरी प्रभावशून्य राहिली आहे.

हंगामी विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीचा कारभार बेभरोशाचाच राहिला, तर सत्ताधाऱ्यांकडून स्वत:चे कोटकल्याण करण्याच्या प्रवृत्तीमुळे पालिकेचा विकास खासदारांच्या भरोशावरच सुरू आहे.

चौकट

राष्ट्रवादीचा कारभार हंगामी

तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा कारभार बेभरवशाचा राहिला असून, त्यांची कामगिरी हंगामीच राहिली आहे. राष्ट्रवादीचे एक, दोन नगरसेवक सर्वसाधारण सभा आणि एखाद्या ठेक्याच्या विषयावर मोजका आक्षेप सोडला तर पुन्हा दिसून येत नाहीत. बाकीचे नगरसेवक केवळ सह्याजीराव आहेत, तर काही महिला नगरसेविकांच्या पतीच्याच पालिकेत उचापती असल्याचेही दिसून आले आहे. राष्ट्रवादीच्या हंगामी विरोधामुळे भाजपच्या कारभाऱ्यांचाही कारभार निरंकुश राहिला आहे.