शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तानाजीराव मोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

सांगली : सामाजिक आणि पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी तानाजीराव मोरे (वय ८७) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने ...

सांगली : सामाजिक आणि पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी तानाजीराव मोरे (वय ८७) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. सांगलीतील विविध संस्थांमध्ये सक्रिय असलेल्या मोरे यांनी अखेरपर्यंत सामाजिक बांधिलकी जपत कार्य केले.

वन विभागात नोकरी लागण्यापूर्वी मोरे गोटखिंडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. नव विभागातून ते वनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. सांगलीतील मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. संस्थेचे वधू-वर मेळावे आणि संगणक प्रशिक्षण केंद्र या दोन महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. एडसग्रस्तांचे पुनर्विवाह, विधवा-विधूर पुनर्विवाह आणि त्यांचे पुनर्वसन या कामातही त्यांनी मोठे योगदान दिले.

नवभारत शिक्षण मंडळाचे ते उपसंचालक होत. दिवंगत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. शांतिनिकेतन परिवारात संस्थेचे उपसंचालक म्हणून अखेरपर्यंत त्यांनी निष्ठापूर्वक काम केले. ते उत्कृष्ट टेनिसपटू आणि कुस्तीचे शौकीन होते.

उपवनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसेच कोल्हापूर व सावंतवाडी येथे उपवनसंरक्षक पदावर त्यांनी उल्लेखनीय काम केले.

सांगली रोटरी क्लबचे अध्यक्ष असताना त्यांनी पर्यावरणाला पोषक असे अनेक उपक्रम राबवले. सेवानिवृत्तीनंतर ते पर्यावरणाबाबत काम करणाऱ्या आभाळमाया, आमराई क्लब आणि इतर विविध संस्था, संघटना आणि चळवळींमध्ये सक्रिय सहभाग देत होते. सांगलीत त्यांनी सुरू केलेला वृक्षदिंडीचा कार्यक्रम आजही सुरू आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचे ते व्याही होत. त्यांच्या पश्चात मुलगा रणदीप, मुलगी वैष्णवी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.