शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कालवा फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

प्रभाकर जाधव : जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

शेगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई निधीतून जत तालुक्यातील साठवण तलाव भरण्याचे आदेश दिले आहेत. म्हैसाळचे हे पाणी ३१ जुलैपर्यंत सोडले जाणार आहे. केवळ बारा दिवसच बिरनाळ तलावात पाणी सोडण्यात आले. मात्र पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पाच दिवसांच्या आत कालवा फोडून हे पाणी वळविले आहे. जतला पाणी येण्यासाठी शेतकऱ्यांनाच हा कालवा श्रमदानातून व स्वखर्चातून दुरुस्त करावा लागत आहे. मात्र या शेतकऱ्यांवर स्थानिक शेतकऱ्यांकडून हल्ले होत आहेत. प्रशासनाकडे याबाबत तक्रार करूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे. कालवा बेकायदेशीररित्या फोडणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटणार असल्याची माहिती अजिंक्यतारा फाऊंडेशनच्या अ‍ॅड. प्रभाकर जाधव यांनी दिली.जाधव म्हणाले की, बनाळी, वायफळपर्यंत सध्या पाणी पोहोचू शकते. कालव्याची अपूर्ण कामे केवळ पाच दिवसांत पूर्ण होऊ शकतात. त्याअगोदर प्रतापपूर, वाळेखिंडी, शेगाव, तिप्पेहळ्ळी हे तलाव म्हैसाळच्या पाणी योजनेतून भरणे गरजेचे आहे. मात्र पश्चिम भागातील शेतकरी कालवा फोडून जत तालुक्याला येणारे हे पाणी अडवून घेतात. आमच्या वाट्याचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. किमान जत उत्तर भागातील तलाव तातडीने भरणे आवश्यक आहे. टंचाई निधीतून कवठेमहांकाळ, मिरज, जत येथील साठवण तलाव भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. कुंभारी, शेगाव आदी गावांसह परिसरातील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच पैसे भरले आहेत. पाण्याचे नियोजन योग्यरितीने होण्यासाठी कालवे फोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटणार आहे. (वार्ताहर)