शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी, टेंभू पाणी योजनेचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात!

By admin | Updated: November 9, 2014 23:30 IST

भाजप नेते कोणता निर्णय घेणार, याकडे आता दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

रजाअली पीरजादे - शाळगाव -ताकारी, टेंभू योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, याबाबत भाजप नेते कोणता निर्णय घेणार, याकडे आता दुष्काळी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.ताकारी, टेंभू किंवा म्हैसाळ योजनेची वीजबिले आजपर्यंत टंचाई निधीतूनभरली आहेत. आता पुन्हा वीज बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता हा वीजबिलाचा प्रश्न भाजपच्या कोर्टात गेला आहे. आजपर्यंत वीजबिलाचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, तेव्हा आघाडी काळात भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना यांनी नेहमीच आवाज उठवला होता.आता परिस्थिती बदलली आहे. आज भाजप सत्ताधारी पक्ष बनला आहे, तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहेत. निवडणुकांच्या काळात पाणीप्रश्नासाठी भाजपने मते मागितली होती. साहजिकच आता जिल्ह्यातील भाजप नेते पाणी प्रश्नावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय साखर कारखान्यांनी ताकारी, टेंभू योजनेसाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून लाखो रुपये कापून घेतले आहेत. त्याचा हिशेब कारखानदार आणि टेंभू, ताकारीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही. त्याबाबत काय निर्णय होणार, याकडेही लोकांच्या नजरा लागल्या लागून राहिले आहेत. वस्तुत: युतीच्या काळात ताकारी, टेंभू योजना कार्यान्वित झाल्या. त्यानंतर आघाडी सरकार सत्तेवर आले; परंतु आघाडी सरकारने १५ वर्षांच्या कालावधित या योजना पूर्ण केल्या नाहीत. त्याचा फटका निवडणुकीत आघाडीला बसला. दुसरीकडे निवडणुका काळात भाजपने पाणी योजना पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते खा. संजयकाका पाटील, अजित घोरपडे, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख हे आता काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ताकारी असो, म्हैसाळ असो किंवा टेंभू योजना असो, या सर्वच योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या आहेत. ताकारी योजनेची कामे जवळजवळ पूर्ण होत आली आहेत, तर आशिया खंडातील सर्वात मोठी टेंभू योजना पूर्ण झालेली नाही. निवडणूक काळात राज्यकर्त्यांनी या आज रोजी वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. वीजबिलाचा प्रश्न ऐरणीवरवीज बिलासाठी आघाडी सरकारने पैशाची तरतूद करून ठेवल्याचे कॉँग्रेसचे नेते सांगत आहेत. रब्बी हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामाबरोबर उसासाठीही आज पाण्याची गरज आहे. यासाठी वीजबिले तातडीने भरून योजना सुरू करण्याची मागणी होत आहे.