शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या ताटातही आता तूरडाळीचा तडका

By admin | Updated: July 29, 2016 23:50 IST

शासनाचा निर्णय : जिल्ह्यातील ९७ हजार अंत्योदय, बीपीएल कार्डधारकांना मिळणार लाभ

शरद जाधव -- सांगली --सर्वसामान्यांचे जेवणाचे ताट परिपूर्ण करणाऱ्या डाळींच्या किमती वाढतच चालल्याने, त्यांचे बजेट अक्षरश: कोलमडून गेले आहे. डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश येत असल्याची तक्रार होत असताना, अखेर शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रास्त भाव दुकानातून तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून कमी किमतीत कार्डधारकांना तूरडाळ मिळणार असून जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. आॅगस्ट महिन्यासाठी जिल्ह्यासाठी ९६७.८० क्विंटल तूरडाळ उपलब्ध होणार असून या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना, तूरडाळीचा ‘तडका’ सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे.चाकरमान्यांचा डबा असो किंवा दैनंदिन आहार, डाळींचा वापर अनिवार्य ठरलेला असतो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून बाजारात मिळणाऱ्या डाळींच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत असून भाजीपाल्याच्या किमती वाढत चालल्याने डाळींचा पर्यायही त्यांच्या खिशाला चाट मारून जात होता. सरकारकडून डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करूनही बाजारपेठेत दर चढेच राहिल्याने सर्वसामान्यांच्या मासिक बजेटला कात्री लावावी लागत होती. दरम्यान, यामुळे वाढता असंतोष लक्षात घेता, राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने ७ हजारावर मेट्रिक टन तूरडाळीची आवश्यकता नोंदविली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ६१ हजार ६८५ बीपीएल कार्डधारकांना, तर ३५ हजार ९६ अंत्योदय कार्डधारकांना याचा लाभ होणार आहे. या योजनेतून मिळणारी डाळ अत्यंत कमी प्रमाणात असली तरी, यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य शासनाने तीन महिन्यासाठी प्रति शिधापत्रिकाधारकांना एक किलो तूरडाळ वितरणाचे नियोजन केले असून आॅगस्ट महिन्यासाठी ९६७.८ क्विंटल तूरडाळ वितरणाचे नियोजन आहे. या निर्णयाबरोबरच खुल्या बाजारातील तूरडाळीचे दरही नियंत्रणात आणण्यासाठीचे नियोजन शासनाने केले आहे. त्यानुसार किरकोळ दुकानदार, मॉल, बझार आदी ठिकाणी नियंत्रित दरामध्ये तूरडाळीचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, या आदेशातही नियंत्रित दरानुसार प्रति ग्राहकाला केवळ एक किलोच तूरडाळ देण्याचे आदेश देण्यात आल्याने नियंत्रित दरात अधिक प्रमाणात डाळ मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. अशी मागणी असली तरी शासनाच्या या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे.शिधापत्रिकेवर : जादा तूरडाळ द्याशासनाच्या या निर्णयानुसार येत्या तीन महिन्यासाठी शिधापत्रिका धारकांना नियंत्रित दराने तूरडाळ देण्यात येणार आहे. मात्र, ही डाळ देताना महिन्याला केवळ एक किलोच देण्याचे आदेश असल्याने एक किलो डाळ महिनाभर पुरणार कशी? असा सवाल आता व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डाळीची मर्यादा वाढविण्याची मागणी आहे. तसेच केवळ तूरडाळच न देता सध्या जादा दराने विकल्या जाणाऱ्या इतर डाळीही रास्त भाव दुकानात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.