शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेच्या कालव्याला भेगा

By admin | Updated: May 14, 2016 00:51 IST

अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका : क्षमतेपेक्षा जादा पाणी भरल्याने धोका

अतुल जाधव / देवराष्ट्रे ताकारी उपसा योजनेच्या टप्पा क्र. ३ जवळ मुख्य कालव्याची दारे बंद केल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी तुंबले गेले. त्यामुळे मुख्य कालव्याचा भराव भिंतीला चार ते पाच सेंटीमीटर रुंदीच्या भेगा पडल्या आहेत. या भेगा तीन ते चार ठिकाणी पडल्या असून त्यांची लांबी एक किलोमीटरवर आहे. यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. जेथे भेगा पडल्या आहेत, तेथील भरावाची उंची ३० ते ४० फूट असल्याने कधीही हा भराव ढासळण्याची शक्यता आहे. ताकारी उपसा योजनेच्या टप्पा क्र. तीनजवळची मुख्य कालव्याची दारे पाणी चालू असताना एका अभियंत्याने बंद करायला लावली. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली. योजनेच्या आठही पंपांचे सर्व पाणी टप्पा क्र. ३ हौदात सोडले. या हौदाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे पाणी हौद भरून ओढ्या-ओघळीला जाऊ लागले. मात्र दारे खुली केली नाहीत. त्यामुळे पाणी वाढत गेले. ही पातळी टप्पा क्र. ३ पासून पाठीमागे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत गेली. कालवा क्षमतेपेक्षा अधिक भरला. पाणी बाहेर पडू लागले. भराव, भिंती खचू लागल्या. नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी दक्षता म्हणून कालवा सुरू केला, तेव्हा दारे खुली करण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत मुख्य कालव्याच्या भरावाला चार ते सेंटीमीटर रुंदीच्या भेगा पडल्या होत्या. अशा भेगा तीन ते चार ठिकाणी पडल्या असून याची लांबी एक किलोमीटरवर अधिक आहे. या कालव्याचा भराव खचण्याचा किंवा फुटण्याचा धोका लक्षात घेऊन रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक पाटबंधारे विभागाने थांबवली आहे. दक्ष नागरिक व कर्मचारी यांच्या जागरुकपणामुळे धोका तात्पुरता तरी टळला आहे. मुख्य कालव्याच्या भराव भिंतीला पडलेल्या भेगा धोकादायक आहेत. या भरावावरून जड वाहन गेले तर हा भराव खचू अथवा ढासळू शकतो. यामुळे कालवा फुटून पाणी इतरत्र पसरू शकते. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ताकारी योजनेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम न केल्यास मुख्य कालव्याला धोका निर्माण होऊ शकतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वांगी सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की, याबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चा केली असून याबाबत लवकरच निर्णय होईल.