मिरज : मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भेट दिली. यावेळी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप व वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
मंत्री डॉ. कदम यांनी हॉस्पिटलमधील कोविड सेंटरची पाहणी केली. कोविड रुग्णांशी व डॉक्टरांशी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांच्याशी कोरोना सुविधा व उपचाराबाबत सविस्तर चर्चा केली.
मंत्री डॉ. कदम यांनी नॉन कोविड विभागाला सुद्धा भेट दिली. हॉस्पिटलमध्ये असणारे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, सीसीयू विभाग, आधुनिक यंत्रणेसह सुसज्ज कॅथलॅब, एनआयसीयू, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग या सर्वांची पाहणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेचे कौतुक केले. तसेच सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व प्रशासकीय अधिकारी यांचेही उत्कृष्ट व्यवस्थापन करीत असल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजित भोसले, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ तसेच प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.