शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

विवाहितेच्या खुनामागे ‘सुपारी’चा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील गीतांजली मोरे या विवाहितेच्या खुनाचे गूढ रविवारी दुसºयादिवशीही कायम होते. दुधगाव, कवलापूर येथे छापे टाकून पतीसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण अजून कोणतीही ठोस मािहती हाती लागलेली नाही. ‘सुपारी’ देऊन तिचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील गीतांजली मोरे या विवाहितेच्या खुनाचे गूढ रविवारी दुसºयादिवशीही कायम होते. दुधगाव, कवलापूर येथे छापे टाकून पतीसह चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पण अजून कोणतीही ठोस मािहती हाती लागलेली नाही. ‘सुपारी’ देऊन तिचा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामध्ये गीतांजलीच्या पतीच्या पुण्यातील एका मित्राचे नाव पुढे आले आहे.शनिवारी सकाळी मुलगी शाळेला गेल्यानंतर गीतांजलीचा खून करण्यात आला होता. प्रथम तिचा वायरने गळा आवळला. त्यानंतर गळ्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले होते. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत विच्छेदन तपासणी सुरू होती. यामध्ये गळ्यावर व मानेवर तीन ते पाच सेंटीमीटरचे वार आहेत. हल्ल्यासाठी गुप्तीचा वापर केल्याचा संशय आहे. गीतांजली व तिचा पती यांच्या घरातील व्यवसायावरुन वाद होते. या वादातून गीतांजलीने पती व सासू, सासºयाला घरातून बाहेर काढले होते. ती दुधगावमध्ये मुलीसोबत रहात होती. घरगुती वाद किंवा ‘नाजूक’ संबंध या कारणावरुन तिचा खून झाल्याची शक्यता व्यक्त करुन पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. घरगुती वादाच्या मुद्याची पडताळणी करण्यासाठी तिचा पती तसेच कवलापूर येथील तीन नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु ठेवली आहे. परंतु त्यांच्याकडून खुनाचे गूढ उकलेल, अशी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.सराफी व्यवसायानिमित्ताने गीतांजलीचा पती दोन वर्षापूर्वी पुण्यात होता. गीतांजलीही त्याच्यासोबत राहत होती. याचवेळी तिची पतीच्या मित्राशी ओळख झाली. या ओळखीतून तिने मित्राचा पुण्यातील एक फ्लॅट बळकावला होता. तो विकून तिच्याकडे २५ लाखांची रक्कम आली होती. या प्रकारामुळे मित्राने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याचे नातेवाईक गीतांजलीवर चिडून होते, अशी माहितीही तपासातून पुढे आली आहे. कदाचित हा मुद्दाही खून करण्यामागे असण्याची शक्यता आहे. कदाचित तिचा खून करण्यासाठी ‘सुपारी’ दिल्याचा संशय आहे. तशी माहिती चर्चेतून पोलिसांना मिळाली आहे. मात्र ठोस माहिती नाही. दुधगावमध्ये शेजाºयांकडे चौकशी करुन तिच्या घरी कोण आले होते का? याबद्दल रविवारीही चौकशी करण्यात आली.प्रथम गळा आवळलाहल्लेखोर गीतांजलीच्या ओळखीचे असण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत ती खुर्चीवर बोलत बसली असावी. कारण तिचा खुर्चीवर असतानाच प्रथम केबल वायरने गळा आवळल्याचे पुरावे मिळाले आहेत. गळा आवळलेली वायर जप्त केली आहे. तिची जीभही बाहेर आली होती. हल्लेखोरांसोबत शरीर संबंध आले होते का, याचा वैद्यकीय तपासणीतून उलगडा करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. वैद्यकीय तपासणीचा व्हिसेरा राखून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर या गोष्टीचा उलगडा होईल.