शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनावरून ‘स्थायी’त गदारोळ

By admin | Updated: January 2, 2015 00:06 IST

मेहेरनजर : सहाजणांचे निलंबन मागे; वरिष्ठांवरच ठपका

सांगली : महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळेंसह सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून आज स्थायी समितीत गदारोळ झाला. स्थायीने या सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेत त्यांच्यावर मेहेरनजर दाखविली. स्थायी सभापतींना न्यायाधीशांचा दर्जा असल्याने त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आयुक्तांवर जोरदार टीकाही करण्यात आली. याबाबत उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही मौन पाळल्याने त्यांनाही लक्ष्य केले. बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यावरून दोन महिन्यांपूर्वी बराच गदारोळ उडाला होता. या प्रकरणात आयुक्त अजिज कारचे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व स्वच्छता कर्मचारी गोविंद मद्रासी या दोघांना निलंबित केले. कॉलेज कॉर्नर येथे रस्ता खुदाई प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून बांधकाम विभागाकडील डी. डी. पवार यांच्यावर कारवाई झाली होती. तसेच पाणीपुरवठा विभागातील आणखी दोन कर्मचाऱ्यांनाही विविध कारणांवरून निलंबित करण्यात आले होते. डी. डी. पवार व अन्य तिघांनी आॅगस्ट महिन्यात या कारावाईविरोधात स्थायी समितीकडे अपील केले होते. त्यावर स्थायीने त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर घेण्याचे आदेश दिले. पण या आदेशाची अंमलबजावणी न करता आयुक्त कारचे यांनी चौकशी समिती नियुक्तीचा शेरा मारला होता. त्यावर सभेत वादळी चर्चा झाली. अपिलाच्या प्रकरणात सभापतींना न्यायाधीशांचा दर्जा असतो. त्यांच्या निकालावर पुन्हा शेरा मारण्याचा आयुक्तांना अधिकार आहे का? असा सवाल सुरेश आवटी व अन्य सदस्यांनी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांना केला. पण ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. आयुक्तांचा बचाव करीत असाल, तर तुम्हाला पीठासनावर बसण्याचा अधिकार नाही, असा टोलाही सदस्यांनी लगाविला. डॉ. आंबोळेंच्या प्रकरणातही पालिका कर्मचाऱ्यांनाच दोषी ठरविण्यात आले. वास्तविक मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलीस व रुग्णालय प्रशासनाची आहे. या दोन्ही प्रशासनाने त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही. उलट पालिकेने मात्र दोघांवर कारवाई केली. (प्रतिनिधी)सांगली शहर एलईडीने उजळणारशहरातील मुख्य बाजारपेठेसह काही चौक एलईडी दिव्याने उजळणार आहेत. त्याला आज स्थायीने मंजुरी दिली. शहरातील टिळक चौक ते महापालिका मुख्यालय, कापडपेठ, मेनरोड ते गणपती मंदिर, स्टेशन चौक आणि पंचमुखी मारुती रस्ता या परिसरात एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्याचबरोबरच शहरातील गटारी, रस्ते व बगीचा या साडेपाच कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली.