शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

खंडेराजुरीत सहा कर्मचारी निलंबित-- संघटनेची फिरकी

By admin | Updated: December 24, 2014 00:20 IST

दहाजण दोषी : प्रसूतीस आलेल्या महिलेकडे दुर्लक्षप्रकरणी कारवाई

सांगली : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन आरोग्य सेविकांसह अन्य चार कर्मचाऱ्यांना आज, मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी निलंबित केले. आरोग्य केंद्रातील डॉ. ए. आर. गुरव, डॉ. डी. बी. कांबळे या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही दोषी धरण्यात आले असून, त्यांच्या निलंबनाची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये बाराजणांची चौकशी करण्यात आली असून त्यातील दहाजण दोषी आढळले आहेत.खंडेराजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी एक महिला प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे संबंधित महिला प्रवेशद्वारातच प्रसूत झाली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांतून करण्यात आली होती. याप्रकरणी खुलासा देण्यासाठी दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह बाराजणांना सतीश लोखंडे यांनी नोटिसा बजावल्या होत्या. बारा कर्मचाऱ्यांनी खुलासा दिला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका अधिकाऱ्यांचे मत घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यातील सहा जणांना निलंबित करून दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली. संघटनेची फिरकीया प्रकरणामध्ये सरसकट कारवाई करण्यात येऊ नये, या मागणीसाठी कर्मचारी संघटनेचे नेते मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. वैयक्तिक सूचनाही देण्यात आल्या. गैरशिस्त खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असे त्यांना वाटल्यास ते स्वत: माझ्यासमोर उपस्थित राहिले असते, असे लोखंडे यांनी बजावले. कोणावरही विनाकारण कारवाई होणार नाही आणि दोषींना खपवूनही घेतले जाणार नाही, असेही त्यांनी संघटनेला सुनावले.