शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘टाळे ठोक आंदोलन’ आश्वासनानंतर स्थगित

By admin | Updated: November 11, 2014 00:06 IST

शिराळा रुग्णालय : लवकरच डॉक्टरांची नियुक्ती

शिराळा : शिराळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, यासाठी मनसेमार्फत रुग्णालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले होते. आठ दिवसांत शिराळा व कोकरुड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे यांनी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. कोळी यांना भ्रमणध्वनीवरून दिल्याने मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी आठ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित केले आहे. आठ दिवसांत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न केल्यास तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी दिला.शिराळा ग्रामीण रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना दोनच अधिकारी आहेत. कोकरुड ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच अधिकारी आहे. सुरळीत आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे मनसेमार्फत रुग्णालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास रावळ यांनी या आंदोलनाबाबत वरिष्ठांशी संपर्क केला असता, आठ दिवसात येथे अधिकाऱ्याची नेमणूक करू, असे आश्वासन दिल्यावर, तात्पुरते हे आंदोलन स्थगित करण्यात आले.त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंदराव कांबळे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सौ. एस. ए. इनामदार आल्या. यावेळी सावंत यांनी, तालुक्यातील सर्वच रुग्णालयातील अधिकारी नेमलेल्या ठिकाणी रहात नाहीत. रुग्णालयात सोयी-सुविधा नाहीत, कर्मचारी नाहीत. फक्त कर्मचाऱ्यांवर पगार खर्ची पडत आहे. रुग्णालयातील औषधे बाहेर विकली जातात. जर वैद्यकीय अधिकारी नेमलेल्या ठिकाणी रहात नसतील, ते कामावर येण्यास तयार नसतील, तर अशांवर कारवाई करावी. तालुक्यात आरोग्य सुविधा सुधारली नाही, तर दोन ग्रामीण रुग्णालये व सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकाच दिवशी टाळे ठोकू, असा इशारा दिला.यावेळी सावंत म्हणाले की, तालुक्यात विनापरवाना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची लूट चालू आहे. तसेच पॅथॉलॉजी लॅबना परवानगी नसताना, विनाकारण गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच पांढऱ्या, तांबड्या पेशी वाढल्याचे कारण सांगून रुग्णांकडून उपचाराच्या नावावर पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांना तुम्ही आळा घालावा व त्यांची चौकशी करावी, असेही सावंत यांनी सांगितले. यावेळी संजय पाटील, जयवंत चौगुले, अविनाश खोत, दिलीप माने, मोहन पाटील, भारत बाबर, संभाजी घागरे, सूरज बाबर उपस्थित होते. (वार्ताहर)वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या आम्हाला अधिकार नाही, तसेच अनेकजण ग्रामीण भागात येण्यास तयार नाहीत. तरीही या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आठ दिवसात नेमणूक करू.- डॉ. आर. बी. मुगडेआरोग्य उपसंचालक, कोल्हापूरआरोग्य सेवेचा बोजवाराशिराळा ग्रामीण रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना, दोनच अधिकारी आहेत. कोकरुड ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच अधिकारी आहे. सुरळीत आरोग्य सेवा मिळत नाही. रुग्णालयात सोयी-सुविधा नाहीत, कर्मचारी नाहीत, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते.