शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

झांबरे खून खटल्यातील साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: October 27, 2014 00:01 IST

घातपाताची शक्यता : नातेवाइकांची तक्रार

कवठेमहांकाळ : घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष सुभाष झांबरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार विकास विष्णू शिंदे (वय २०, रा. घाटनांद्रे) याचा त्याच्याच द्राक्ष बागेमध्ये रविवारी सकाळी मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत होती.जानेवारी २०१२ मध्ये घाटनांद्रे येथील सुभाष झांबरे यांचा राजकीय वैमनस्यातून खून झाला होता. विकास शिंदे हा या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. या खटल्याची गेल्या वर्षभरापासून सांगली जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरूआहे. सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये विकास शिंदे याचीही साक्ष पूर्ण झाली होती. तेव्हापासून घाटमाथ्यावर तणावपूर्ण शांतता आहे.विकास शिंदे शनिवारी दुपारी त्याच्या द्राक्षबागेकडे गेला होता. तेव्हापासून तो घरी आला नव्हता. तो शेतात गेला आहे म्हटल्यावर घरच्यांनीही नेहमीप्रमाणे लक्ष दिले नाही. विकास शिंदे याचा गुहागर- विजापूर मार्गानजीक काही अंतरावर भटकीचे शेत म्हणून परिचित असलेल्या परिसरात मळा आहे. विकास अद्याप घरी का आला नाही, हे पाहण्यासाठी आज, रविवारी सकाळी दहानंतर त्याचे कुटुंबीय व काही मित्र शेतात गेले असता विकासचा मृतदेह मळ््यात आढळला. मृतदेह संशयास्पद अवस्थेत होता. सरपंच अमर शिंदे यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मृतदेहाचे विच्छेदन कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मात्र तपासणीचा अहवाल राखून ठेवला आहे. यामुळे मृत्यूचे कारण समजू शकले नाही. विकासचा मृत्यू हा घातपाती असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात ते उद्या (सोमवार) तक्रार दाखल करणार असल्याचे सरपंच शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)