शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दु:खातील कुटुंबांना दिला ‘आधार’

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

फराळाचे वाटप : मिरजेत आधार संस्थेचा उपक्रम

मिरज : एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर वर्षभर त्या कुटुंबात कोणताही सण साजरा केला जात नाही. अशा दु:खी कुटुंबांना मिरजेतील आधार संस्थेतर्फे मागील सात वर्षांपासून दिवाळीत फराळ वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संस्थेतर्फे फराळाचे साहित्य देऊन त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचा आधार दिला जात आहे. भारतीय समाजात दिवाळी सणाला मोठे महत्त्व आहे. फराळाचे विविध पदार्थ बनवून कुटुंबातील सदस्य, मित्र व नातेवाईकांसह त्याचा आस्वाद घेऊन दिवाळी सण साजरा करण्यात येतो. मात्र एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास दु:खामुळे वर्षभर त्या कुटुंबात दिवाळीसह इतरही सण साजरे केले जात नाहीत. अशावेळी त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडून फराळाचे साहित्य देण्याची प्रथा आहे. मात्र बदलत्या परिस्थितीत कुटुंबातील दुरावा वाढल्याने ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहे. दु:खात असलेल्यांना आधार देण्याची ही प्रथा जिवंत ठेवण्यासाठी फराळाचे पदार्थ देण्याचा उपक्रम मिरजेतील आधार संस्थेने सुरू केला आहे. शहरात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या नागरिकांची माहिती संस्थेकडे संकलित करण्यात येते. संस्थेचे कार्यकर्ते याची नोंद ठेवतात व दिवाळीपूर्वी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातूनही माहिती घेण्यात येते. व्यक्तीचे निधन झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन संस्थेचे कार्यकर्ते फराळाचे साहित्य व सांत्वन पत्र देतात. संस्थेचे मोहन वाटवे, मकरंद देशपांडे, अमित पटवर्धन, प्रसन्न चिप्पलकट्टी, वाय. सी. कुलकर्र्णी यासाठी प्रयत्न करतात. (वार्ताहर)