शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:26 IST

पलूस : केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे साखर कारखानदारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे, अशी टीका क्रांती कारखान्याचे अध्यक्ष ...

पलूस : केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे साखर कारखानदारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे, अशी टीका क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आ. अरुण लाड यांनी केली. तसेच कारखानदारी वाचविण्यासाठी शासनाने साखर उद्योगाचे ठोस धोरण निश्चित करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याची सभा ऑनलाइन झाली. यावेळी अरुण लाड बोलत होते. ते म्हणाले, यावर्षी साखर निर्यातीचा निर्णय तीन महिने उशिरा झाला. या शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे कारखान्यांना आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. शासनाने साखरेचा हमी भाव प्रतिक्विंटल तीन हजार ५०० रुपये निश्चित करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांच्या उसाला जास्‍त दर देणे शक्‍य होईल. कारखान्याची वीज सध्या ६.६४ रुपये युनिट दराने महावितरण कंपनी विकत घेते आहे; परंतु नवीन करारात हा दर ४.४५ रुपये एवढा कमी केला आहे. प्रदूषणाशिवाय तयार होणाऱ्या या विजेला चांगला भाव मिळणे आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, कारखान्‍याने ऊस नोंदणी व तोडणी यंत्रणा अद्ययावत केल्यामुळे पारदर्शकता आली आहे. गतवर्षी कोणत्‍याही कारखान्‍याला सॉफ्ट लोन घेतल्‍याशिवाय शेतकऱ्याचे देणे देता आले नाही. शेती व शेतकऱ्यांवरील हल्‍ले थांबविण्‍यासाठी अभ्‍यासपूर्ण शेती करणे आवश्‍यक आहे. तरच उत्‍पादन खर्च कमी होईल आणि फायदा वाढेल. कारखाना कार्यक्षेत्रात ५४ टक्‍के ऊस क्षेत्र ठिबकखाली आणले आहे. यामुळे उसाचा एकरी ५२ टनांपर्यंत उतारा गेला आहे. कारखान्‍याने शेतकऱ्यांची व बँकांची, कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, तोडणी वाहतूक कमिशन अशी सर्व देणी वेळेत दिली आहेत.

कारखान्याचे उपाध्यक्ष अनंत जोशी यांनी प्रास्ताविक केले. विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्‍हाणे, वित्त अधिकारी शामराव जाधव, सचिव आप्‍पासाहेब कोरे यांनी केले. दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संदीप पवार यांनी आभार मानले.

ऑनलाइन आणि ऑफलाइन सभासदांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांना अरुण लाड यांनी समर्पक उत्तरे दिली.

यावेळी क्रांती दूध संघाचे अध्‍यक्ष किरण लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड, दिलीप लाड, वसंतराव लाड, कुंडलिक एडके, वैभव पवार, तानाजी जाधव, चंद्रकांत चव्हाण, मारुती हुबाले, सतीश चौगुले, अर्जुन पवार, पंढरीनाथ पाटील, दत्ताजीराव मोहिते, बाबासाहेब शिंदे, प्रकाश पाटील, दीपक बिरणाळे, मुकुंद जोशी, अरुण कदम, महादेव पवार यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

कारखान्यांना उपपदार्थांसाठी परवानगी द्या

आसवणी प्रकल्‍प हा अद्ययावत व प्रदूषणमुक्‍त उभारला आहे. मोलॅसिस, ज्यूसपासून जे इथेनॉल व स्पिरिट काढण्यास शासनाने परवानगी देण्याची गरज आहे. यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न संपुष्टात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.