शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

येळापूरच्या कुस्ती मैदानात सांगलीचा सुदेश ठाकूर विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST

कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. यात पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत सांगलीच्या ...

कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. यात पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत सांगलीच्या सुदेश ठाकूरने कोल्हापूरच्या विकास पाटील याच्यावर गुणाने विजय मिळविला.

प्रारंभी कुस्ती मैदानाचे उद्घाटन वस्ताद विठोबा लोहार, उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड, सुरेश चिंचोलकर, सरपंच बाबा गोळे, आबा शिंदे, विलास गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सुकुमार जाधव याने संदीप बंडगर याच्यावर १४ व्या मिनटाला विजय मिळवीत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. तिसऱ्या क्रमांकाची दत्ता बानकर विरुद्ध सूरज पाटील यांच्या लढतीत दत्ता बानकर गुणांवर विजयी झाला. चाैथ्या क्रमांकाच्या लढतीत अजय शेडगे याने शुभम पाटील यास ११ व्या मिनिटला चितपट केले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत वैभव यादव याने अनिकेत खोत याच्यावर एकलांगी डावाने विजय मिळविला.

पहिल्या सात विजयी मल्लांना प्रचिती दूध संघाचे संचालक सुरेश चिंचोलकर व शिवाजी लाड यांच्यातर्फे प्रत्येकी एक किलो तूप वाटप केले. पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, शिवाजी पाटील, मारुती पाटील, राहुल जाधव, नाना गायकवाड यांनी काम पाहिले. सदाशिव लाड, जयवंत कडोले, राहुल गायकवाड, दत्ता हाप्पे, कुमार कडोले, दादा कुंभार, विजय आटकेकर, तानाजी शिंदे, मारुती यादव, किसन आटूगडे यांनी संयोजन केले. सुरेश जाधव-चिंचोलीकर यांनी समालोचन केले. यावेळी ऑलिम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, विस्तार अधिकारी सुभाष लाड, सुहास घोडे, दिनकर दिंडे, सरपंच मारुती कांबळे उपस्थित होते.

चाैकट

इतर विजयी मल्ल

कर्तार कांबळे, आशुतोष लाड, विशाल जाधव, प्रदीप पाटील, विवेक लाड, अभिजित पाटील, सुशांत गायकवाड, वेदांत कडोले, शंभूराज पाटील, गणेश पवार, आदित्य लाड, सूरज गोळे, सौरभ पाटील, अमर पाटील, प्रणव जाधव, रोहन माने, मयूर रोकडे, स्वीकार सावंत, राजवर्धन पाटील, संकेत नेर्लेकर, अथर्व पाटील, साहिल वाघमारे, शुभम गोळे, रोशन पाटील, शंकर भोसले यांनी प्रतिस्पर्धीवर विजय मिळविला.