शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर पालिकेत सुभाष सूर्यवंशींची बाजी

By admin | Updated: July 22, 2014 23:13 IST

नगराध्यक्ष निवडणूक : बाबासाहेब सूर्यवंशींच्या खेळीला खो

अशोक पाटील - इस्लामपूरएकाच प्रभागातील, पण एकमेकांचे कट्टर विरोधक भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीचे सुभाष सूर्यवंशी यांच्या शह-काटशहच्या राजकारणात सुभाष सूर्यवंशी यांनी बाजी मारली असून, बुधवारी ते इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदावर विराजमान होत आहेत. त्यांना नगराध्यक्षपद मिळू नये म्हणून शासकीय दरबारी तक्रारी करण्याची बाबासाहेब सूर्यवंशी यांची राजकीय खेळी अयशस्वी ठरली आहे.बाबासाहेब सूर्यवंशी हे राजारामबापू पाटील यांचे कट्टर समर्थक, मात्र नंतर त्यांनी अण्णासाहेब डांगे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते सुभाष सूर्यवंशी यांचे कट्टर विरोधक बनले. सुभाष सूर्यवंशी पहिल्यापासून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. पालिकेच्या पाच निवडणुका बुरुड समाजातील या दोन सूर्यवंशींमध्येच रंगल्या. त्यातील तीनवेळा सुभाष सूर्यवंशी यांनी विजय मिळविला.येणाऱ्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाले. या प्रवर्गातून एकमेव सुभाष सूर्यवंशी यांनाच संधी मिळणार हे निश्चित होते, परंतु बाबासाहेब सूर्यवंशी यांनी त्यांना नगराध्यक्षपद मिळू नये म्हणून भूखंड खरेदी घोटाळा पुढे केला. यासाठी त्यांनी तक्रारीही दाखल केल्या आहेत. परंतु त्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. हा निकाल त्वरित लागण्यासाठी बाबा सूर्यवंशी यांनी युध्दपातळीवर प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही.पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे सुभाष सूर्यवंशी कट्टर समर्थक आहेत. जयंत पाटील यांनी त्यांना ‘महानंद’च्या संचालकपदीही संधी दिली होती. नेते-पक्षनिष्ठेमुळेच त्यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. सुभाष सूर्यवंशी यांना ही संधी मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांतील काही मंडळींनीही प्रयत्न केले होते, परंतु जयंत पाटील यांनी एकमेव सूर्यवंशी यांचाच अर्ज दाखल करण्याचे आदेश देऊन सर्वांनाच ‘करेक्ट’ कामाचे संकेत दिले.इस्लामपूर नगरपालिकेच्या इतिहासात बुरुड समाजाला प्रथमच नगराध्यक्षपद मिळणार आहे. निवडीनंतर बुधवारी सकाळी ११ वाजता सुभाष सूर्यवंशी यांची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढली जाणार आहे.स्वत:च्या घराचे बांधकाम आणि जागा खरेदीमध्ये केलेला गैरप्रकार याबाबत सुभाष सूर्यवंशी यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी न्यायप्रविष्ट आहेत. यासाठी अखेरपर्यंत लढा देणार असून, त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी हा लढा आहे.- बाबासाहेब सूर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य, भाजप.