शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पाठ्यपुस्तकांची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

जत : शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला १८ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात केली. तीन आठवडे उलटून गेले तरी जत तालुक्यातील ...

जत : शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला १८ जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात केली. तीन आठवडे उलटून गेले तरी जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. एकीकडे अभ्यासक्रमाचा गोंधळ उडाला असून, विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याने शिक्षण विभागात सावळा गोंधळ निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तथापि, शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन आठवडे उलटून गेले तरी जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

यंदाच्या शैक्षणिक सत्राला १८ जूनपासून सुरुवात झाली असली तरी शाळांत शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने धडे देण्याच्या सूचना आहेत. मात्र विद्यार्थ्यांकडे अद्याप पाठ्यपुस्तकेच नसल्याने शिक्षक अध्यापन करणार कसे आणि विद्यार्थी ऑनलाइन वर्गात अध्ययन करणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी पुस्तके प्राप्त झाल्यानंतर कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन त्यांचे वितरण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहे.

चाैकट

कोरोनामुळे छपाई नाही

कोरोनाच्या साथीमुळे शासकीय मुद्रणालयातून छपाई झाली नसल्याने पुस्तके अद्याप उपलब्ध झाले नसल्याची चर्चा आहे. पुस्तकांची गरज ओळखून जत तालुक्यातील काही शाळांनी निकालपत्र देतानाच जुनी पुस्तके विद्यार्थ्यांकडून घेतते. ती नवीन वर्षाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. पाठ्यपुस्तक टंचाईची झळ अनेक शाळांना जाणवत आहे.