शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकाने प्रवाशांना लुटले

By admin | Updated: October 26, 2014 00:03 IST

रेल्वेतील घटना : जागेच्या बसण्यावरून बाचाबाची

मिरज : किर्लोस्करवाडी (ता. पलूस) रेल्वे स्थानकावर कोयना एक्स्प्रेसने मुंबई-कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशास चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून सोन्याची अंगठी, मणीमंगळसूत्र असा ६२,५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. याप्रकरणी प्रवीण भानुदास कदम (वय २८) व सुनील भानुदास कदम (३४, दोघे रा. बांबवडे, ता. पलूस) यांना आज (शनिवारी) सायंकाळी मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली. सुभाष वसंतराव बिरांजे (रा. कोल्हापूर) पत्नी, मेहुणी व मुलासह शुक्रवारी कोयना एक्स्प्रेसने मुंबईहून कोल्हापूरकडे रेल्वेने येत होते. पुणे रेल्वे स्थानकावर संशयित प्रवीण कदम याच्याशी बसण्याच्या जागेवरून त्यांची बाचाबाची झाली. यावेळी प्रवीण कदम याने गावाकडे दूरध्वनी करून सुनील कदम व साथीदारांना किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले. गाडी किर्लोस्करवाडीत आली असता सर्वांनी डब्यात घुसून सुभाष बिरांजे व त्यांच्या पत्नीस लाथा-बुक्क्याने मारहाण करून, चाकूचा धाक दाखवून अंगठी व मंगळसूत्र हिसकावून घेतले व डब्यामध्ये दहशत निर्माण केली. मिरज रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी पलूस पोलिसांच्या मदतीने किर्लोस्करवाडी, पलूस, दुधोंडी या गावांत शोध घेऊन संशयितांना अटक केली. बांबवडेमधील इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सर्व संशयितांना २७ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (वार्ताहर)