शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : सर्वांना समान न्याय दिला जाणार असल्याने जे लॉकडाऊनचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : सर्वांना समान न्याय दिला जाणार असल्याने जे लॉकडाऊनचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिला.

व्यापारी असोसिएशनच्या सभागृहात आयोजित बैठकीत तहसीलदार शिंदे बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मुख्याधिकारी योगेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार शिंदे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह दोन खासगी रुग्णालयांसह ३७ ठिकाणी लसीकरण सोय केली आहे. लसीबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. सर्वांनी लस घ्या, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, अत्यावश्यक सेवावगळता सर्व व्यवहार बंद राहतील. सर्वांना समान न्याय दिला जाणार असल्याने जे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने छोटे व्हेंटिलेटर सुरू राहतील. लस संपली असून दोन दिवसात उपलब्ध होईल.

डॉ.प्रवीण पाटील म्हणाले, २२ हजार लसीकरण झाले आहे. शिराळा येथे दोन हजार लसीकरण झाले आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. आजअखेर ९७ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहे.

यावेळी विश्वास कदम, अमोल पारेख, विश्वप्रताप नाईक, उत्तम डांगे, नेहा सूर्यवंशी, सीमा कदम, वसंत कांबळे, किशोर यादव, उमेश कुलकर्णी, राहुल भुरके आदी उपस्थित होते.