शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलला कडकडीत बंद, रास्ता रोको

By admin | Updated: September 13, 2016 00:50 IST

बालकावर अत्याचाराचा निषेध : संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी

कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील नऊ वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी परिसरात उमटले. या घटनेचा निषेध करीत संशयित सचिन सुरेश पाटोळे याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत कुंडलमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कुंडल पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संतप्त जमावाने कुंडल फाट्यावर टायर पेटवून टाकून रास्ता रोको आंदोलन कले. दरम्यान, पोलिसांनी वेजेगाव (ता. खानापूर) येथे सापळा रचून संशयित आरोपीस ताब्यात घेतल्याचे सांगून, त्याच्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कुंडल येथील नऊ वर्षाच्या शाळकरी मुलावर गावातीलच सचिन पाटोळे याने शुक्रवारी अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर गावात संतप्त पडसाद उमटले. गाव बंदची हाक देण्यात आली. कुंडल पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून, सचिन पाटोळे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संतप्त जमावाने कुंडल फाटा, तसेच घाटगे पुलावर टायर पेटवून टाकून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे दोन तास पलूस-कुंडल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी १ वाजता संशयितास वेजेगाव (विटा) येथे सापळा रचून अटक करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पलूस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान, गावातील महिला मंडळांनी पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांना निवेदन देऊन, आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली. यामध्ये देवांग समाजाच्या अध्यक्षा नंदाताई म्हेत्रे, सुमनताई गायकवाड, लोकशासनच्या अध्यक्षा मनीषा रोटे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करीत तीव्र निषेध केला.क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा बॅँकेचे संचालक महेंद्र लाड, शरद लाड, योगेश लाड, अ‍ॅड. दीपक लाड, सर्जेराव पवार आदींनी निषेध व्यक्त करून संशयितास कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. (वार्ताहर)रामोशी संघटनेकडून निषेधपेठ येथील एम. एम. ग्रुप, राज्यस्तरीय रामोशी संघटनेच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. कुंडलमधील घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे प्रवक्ते अंकुश मंडले यांनी केली. सांगलीहून फौजफाटा : कडेकोट बंदोबस्तघटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी तासगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याकडून जादा पोलिस कुमक मागवून घेतली. संतप्त जमाव शांत होत नसल्याचे कळताच पलूसचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तासगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, डॉ. योगेश लाड कुंडल फाट्यावर दाखल झाले. संशयित आरोपी सचिन पाटोळे याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महसूल व पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर संतप्त जमाव नियंत्रणात आला. कुंडलमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सांगली येथून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांची तुकडी कुंडलला दाखल झाली.