शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

विटा बसस्थानकातील स्वच्छता कार्यक्रम रोखला

By admin | Updated: November 9, 2014 23:41 IST

आगारप्रमुखांना घेराव : प्रोटोकॉल न पाळल्याच्या कारणावरून वादंग

विटा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शुक्रवारी विटा बसस्थानकात आयोजित केलेला स्वच्छता कार्यक्रम शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा कार्यक्रम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आयोजित केला असून, तो राजकीय कार्यक्रम नसल्याचे सांगत महामंडळाचे अशासकीय संचालक अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी यशस्वी केला. मात्र, निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सांगलीतील विभाग नियंत्रक दिलीप कदम यांनी या कार्यक्रमाकडेच पाठ फिरविली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शुक्रवारी ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमास विटा येथून सुरूवात करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अशासकीय सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते व विभाग नियंत्रक दिलीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली विटा बसस्थानकात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छापून त्या वितरित करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव नसल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता राजू जाधव, बच्चू नागराळे, जॅक सपकाळ, रवींद्र कदम, शेखर भिंगारदेवे, समीर कदम, हेमंत रोकडे, शिरीष शेटे आदी शिवसैनिकांनी प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल आगारप्रमुख दिलीप पाटील यांना त्यांच्या कार्यालयात घेराओ घातला. त्यांनी हा कार्यक्रम अ‍ॅड. मुळीक यांनी आयोजित केला असून, तो संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यामुळे शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. त्यानंतर अ‍ॅड. मुळीक यांनी उपस्थित शिवसैनिकांना हा देशपातळीवरचा सार्वजनिक कार्यक्रम असून तो राजकीय नसल्याचे सांगून प्रोटोकॉल काय आहे? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. या कार्यक्रमाला प्रोटोकॉलच उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.या प्रकारानंतर शिवसैनिक निघून गेल्यानंतर विटा बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संचालक अ‍ॅड. मुळीक, कामगार नेते बिराज साळुंखे, संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष नाथा रेणुशे, विलास यादव, डेपो सचिव पेंढारी, आगार व्यवस्थापक दिलीप पाटील, स्थानक प्रमुख एच. आर. कोळी, विनायक माळी, कार्यशाळा अधीक्षक पी. एस. शिंदे, दीपक रेडेकर, अ‍ॅड. संदीप मुळीक यांनी हातात झाडू घेऊन बसस्थानकाची स्वच्छता केली. (वार्ताहर)पत्रिकेवरील नावे वगळलीविटा शिवसेनेचे बच्चू नागराळे म्हणाले की, विटा बसस्थानकातील स्वच्छता कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आ. अनिल बाबर, नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे नव्हती. विटा आगाराने प्रोटोकॉल पाळला नसल्याचा जाब विचारल्याचे सांगितले.