शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार भरती प्रक्रिया बंद पाडणार

By admin | Updated: June 30, 2015 00:18 IST

कुपवाडच्या नगरसेवकांचा इशारा : प्रभाग समिती तीनची बैठक

कुपवाड : महापालिकेकडून सध्या राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विभागासाठीच्या कामगार भरती प्रक्रियेमध्ये प्रशासनाकडून कुपवाडवर अन्याय केला जात आहे. कामगार तुटवड्याप्रकरणी गरज असूनही आणि येथील नगरसेवकांनी आवाज उठवूनही काही बड्या पदाधिकाऱ्यांच्या दबावापोटी शहराला कमी कामगार दिले जाणार आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेत कुपवाडला सांगली, मिरजेप्रमाणे समान कामगार न मिळाल्यास ही कामगार भरती प्रक्रियाच बंद पाडणार असल्याचा इशारा प्रभाग समिती क्रमांक तीनच्या मासिक सभेत सोमवारी नगरसेवकांनी दिला. सांगली, मिरजेच्या मानाने अविकसित असलेल्या कुपवाड शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी कामगारांची मोठ्याप्रमाणात गरज आहे. आरोग्य विभागाकडे १०५ कामगारांची मंजुरी असूनही अनेक कामगारांच्या गैरहजेरीमुळे स्वच्छतेची कामे व्यवस्थित होत नाहीत. वीसहून अधिक कामगार सतत गैरहजर राहत असल्याचे समजले. हा कामगार तुटवडा लक्षात घेऊन नगरसेवक विष्णू माने, विजय घाडगे, शेडजी मोहिते यांनी स्थायी समितीच्या सभेत आवाज उठवून, कामगारांची भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी मान्य करून घेतली. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छता कामगारांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मिरजेला, सांगलीला चाळीस आणि कुपवाडला फक्त सोळा कामगारांची भरती केली जाणार असल्याचे नगरसेवकांना समजले. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना सभेत चांगलेच धारेवर धरले. कुपवाडला कामगारांचे समान वाटप न झाल्यास आरोग्य विभागाची कामगार भरती प्रक्रियाच बंद पाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. याबरोबरच नगरसेविका निर्मला जगदाळे, धनपाल खोत यांनी कामगारांची कागदोपत्री बोगसगिरीही चव्हाट्यावर आणली. या बैठकीस उपमहापौर प्रशांत पाटील, प्रभाग तीनच्या सभापती संगीता खोत, सहायक आयुक्त सी. बी. चौधरी, नगरसेविका सुरेखा कांबळे, गुलझार पेंढारी, रोहिणी पाटील, नगरसेवक संतोष पाटील, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, कोथळे, शहर अभियंता सी. जी. सोनवणे, कनिष्ठ अभियंता अशोक कुंभार, अस्लम जमादार, विद्युत अभियंता अमर चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर) अधिकारी धारेवर वीज दुरूस्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उध्दट वागणुकीबद्दल नगरसेवक गजानन मगदूम आणि विजय घाडगे यांनी जाब विचारला. या कामगाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. कुपवाडला जेसीबी न देता कागदोपत्री बिले खर्ची टाकली जात असल्याप्रकरणीही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी यापुढे योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी नरमाईची भूमिका घेतली.