शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये खडी-सिमेंट प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST

कोकरुड : रिझर्व्ह फॉरेस्ट (राखीव वन) क्षेत्र असलेल्या मेणी, येळापूर येथील डोंगर पठाराच्या ठिकाणी रस्ता ठेकेदाराकडून उत्खनन केले जात ...

कोकरुड : रिझर्व्ह फॉरेस्ट (राखीव वन) क्षेत्र असलेल्या मेणी, येळापूर येथील डोंगर पठाराच्या ठिकाणी रस्ता ठेकेदाराकडून उत्खनन केले जात आहे. याच परिसरात त्याने खडी-सिमेंट मिक्सिंगचा प्लांट उभा केला आहे. वनविभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या जंगलातील बिबट्या, गवे, डुकरे यासारखे अनेक प्राणी येऊन शेतीचे नुकसान करत आहेत. नुकसान झालेल्या पिकांची भरपाईही मिळत नाही. त्यातच चांदोली अभयारण्याशेजारी असलेल्या परिसरात जंगल, जंगलाशेजारील गावे आणि जंगलाच्या वीस किलोमीटर क्षेत्रातील गावे असे तीन प्रकारचे झोन वनविभागाने तयार केले आहेत. तिसऱ्या आणि अंतिम झोन असलेल्या प्रकारात मेणी, येळापूर, शेडगेवाडी, नाठवडेपर्यंतच्या गावांचा यात समावेश आहे.

सध्या पाचवड फाटा (कराड) ते कोकरुडपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून याच्या कामासाठी लागणारी माती, मुरूम, दगड हे राखीव वनक्षेत्र असलेल्या मेणी, कुंभवडेवाडी, येळापूर या गावांच्या हद्दीत असलेल्या ठिकाणच्या डोंगर, पठार आणि माळरान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. मात्र वन विभागाच्या क्षेत्रात कुणाल्याही उत्खननास परवानगी नसतानाही या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याने त्याला कोणत्या आधारे परवानगी मिळाली? सर्वसामान्य शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांस त्यांची जनावरे चरायला गेली तरी कारवाई करणाऱ्या वन विभागास हे उत्खनन का दिसले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चाैकट

सर्व प्रक्रियेबाबत आश्चर्य

एखाद्या नागरिकाने जर माती, मुरूम, दगड-धोंडे आणले तर कारवाई करणाऱ्या महसूल विभागाला गेले दोन महिने सुरू असलेला उत्खननाचा प्रकार दिसला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठेकेदाराला अचानक खासगी जागा मिळते काय, दुसऱ्या दिवशी उत्खनन सुरू होते काय आणि लगेच रस्त्यासाठी लागणारा खडी-सिमेंट मिक्सिंग प्रकल्प सुरू होतो, यामागे नेमके कोण आहे याची चर्चा सुरू आहे.