शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा अखेर संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा अखेर गुरुवारी संपुष्टात आला. जिल्हा परिषदेकडे ४६० आणि महापालिकेकडे ८७० डोस शिल्लक आहेत. ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा अखेर गुरुवारी संपुष्टात आला. जिल्हा परिषदेकडे ४६० आणि महापालिकेकडे ८७० डोस शिल्लक आहेत. ते शुक्रवारी (दि. ९) सकाळी तासाभरातच संपतील, त्यानंतर नव्याने पुरवठा होईपर्यंत लसीकरण ठप्प राहणार आहे.

लसींचा तुटवडा मंगळवारपासूनच निर्माण झाला होता. बुधवारी व गुरुवारी उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण झाले. सरकारी व खासगी अशा २२७ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, त्यातील १८५ केंद्रांवर गुरुवारी दुपारीच लस संपली, त्यामुळे लसीकरण थांबले. उर्वरित ४५ केंद्रांवर संध्याकाळपर्यंत साठा संपला. संध्याकाळी आरोग्य विभागाने सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन माहिती घेतली. त्यानुसार ग्रामीण भागात केवळ ४६० डोस शिल्लक आहेत. महापालिका केंद्रांवर सकाळी १६०० डोस शिल्लक होते. सध्या ८७० शिल्लक आहेत. शुक्रवारी सकाळी लस शिल्लक असणाऱ्या मोजक्या केंद्रांवर तासाभरातच ती संपणार आहे.

जिल्हा प्रशासनाने आणखी दोन लाख डोसची मागणी शासनाकडे केली आहे. राज्यातील लसीचा तुटवडा पाहता ती येण्यास किमान पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण पुढील आठवड्यातच सुरू होईल, असा अंदाज आहे. सध्या अनेक लाभार्थींना दुसरा डोस देण्याचे काम सुरू आहे. लसीअभावी त्यांचे लसीकरण आता होऊ शकणार नाही.

चौकट

लसीकरण असे

गुरुवारी ग्रामीण भागात २२६१, निमशहरी भागात ७४९, महापालिका क्षेत्रात १४१७ जणांचे लसीकरण झाले. जिल्हाभरात एकूण ४४२७ जणांना लस टोचण्यात आली. आजअखेर एकूण २ लाख ६८ हजार डोस देण्यात आले आहेत.

चौकट

गुरुवारचे नवे रुग्ण - ४०५

कोरोनामुक्त झालेले - २२३

दिवसभरातील मृत्यू - ५