शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेच्या पाण्याचा शेतीसाठी चोरून वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

वलखड येथे जलस्वराज्य योजनेतून बांधण्यात आलेल्या विहिरीतून सार्वजनिक नळ पाणीपुरवठा करण्यात येतो. गट नं. ९४२ मधील त्या विहिरीलगत ग्रामपंचायतीचे ...

वलखड येथे जलस्वराज्य योजनेतून बांधण्यात आलेल्या विहिरीतून सार्वजनिक नळ पाणीपुरवठा करण्यात येतो. गट नं. ९४२ मधील त्या विहिरीलगत ग्रामपंचायतीचे शिपाई गौतम सखाराम कांबळे यांची स्वमालकीची शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीत सध्या ज्वारी, लसूण, आदी पिके घेतली आहेत. त्या पिकांसाठी सार्वजनिक विहिरीतून चोरून पाणी देण्यात येत आहे. पाणीपुरवठा टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृतरीत्या दुसरी पाईप जोडून ते पाण्याची चोरी करीत आहेत.

तसेच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या उत्तम तुकाराम कांबळे यांच्या नावे गट नं. २३ मध्ये घर नसतानाही सत्ताधारी सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून व पदाचा गैरवापर करीत मनमानी कारभाराने गावालगतच्या शेतात पाणीपुरवठा योजनेचे अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहे. त्यातून मका व लसूण पिकांना पाणी दिले जात आहे. एकीकडे गावातील काही वस्त्यांवर लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसताना व पाणीटंचाई जाणवू लागली असताना ग्रामपंचायतीचे सदस्य व शिपाई यांनी मनमानी कारभार करीत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेचे पिण्याचे पाणी शेतीसाठी वापरण्याचा पराक्रम सुरू केला आहे. याबाबत लोकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नाही.

त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पिण्याच्या पाण्याचा शेतीसाठी वापर करणारे सदस्य उत्तम कांबळे व शिपाई गौतम कांबळे यांच्यावर कारवाई करून या दोघांनाही पदावरून हटवावे, अशी मागणी माजी सदस्य उत्तम जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व खानापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी केली.

फोटो : १३०२२०२१-विटा-वलखड वॉटर

ओळ : वलखड (ता. खानापूर) येथे सार्वजनिक नळ पाणीपुरवठा विहिरीच्या मुख्य जलवाहिनीला दुसरी पाईप जोडून पाण्याची चोरी करून शेतीपिकांना पाणी दिले जात आहे.