शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जतमध्ये द्राक्ष छाटणीस प्रारंभ

By admin | Updated: October 16, 2015 00:54 IST

मजुरांची टंचाई : मान्सूनच्या हुलकावणीने नुकसान; द्राक्ष बागायतदार चिंतेत

संख : जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागात आॅक्टोबर महिन्यातील द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे. सर्वत्र द्राक्ष छाटणीची कामे सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. पावसाअभावी द्राक्ष छाटणीची कामे खोळंबली होती, ती आता सुरू झाली आहेत.तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा लावल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी जातीच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.उमदी, तिकोंडी, बिळूर, डफळापूर, रामपूर, संख, अंकलगी, भिवर्गी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, कोंत्यावबोबलाद आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.दरवर्षी जुलै महिन्यामध्ये आगाप छाटणी केली जाते. परंतु मान्सूनने हुलकावणी दिल्याने ही छाटणी झालेली नव्हती. परतीच्या पावसाने मात्र हजेरी लावल्याने ओढे, नाले, विहिरींना पाणी आले आहे. पुढील पावसाच्या आशेवर आॅक्टोबर छाटणी सुरू केली आहे. ही द्राक्षे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये येतात. सध्या छाटणीला सर्वत्र सुरुवात झाली आहे. छाटणी करण्यासाठी मजुरांच्या गँग आहेत. माडग्याळ, अंकलगी, सिद्धनाथ परिसरातील मजूर जीप, टमटममधून त्यांना आणले जात आहेत.गेल्यावर्षीपेक्षा खते, औषधे, मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बेदाण्याला चांगला दर नसल्याने बेदाणा स्टोअरेजमध्ये ठेवला आहे. स्टोअरेजचे भाडे वगळता पदरात काहीच पडणार नसल्याने द्राक्ष बागायतदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (वार्ताहर)मजुरीच्या दरात वाढद्राक्षबागेतील छाटणी करणे, पेस्ट लावणे, वांझ काढणे, शेंडे खुडणे आदी कामे सुरू आहेत. सर्वत्र कामांची धांदल सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. पुरुषाला ३००, स्त्रियांना २५० रुपये मजुरी आहे. बिहारमधील गँगही उपलब्ध आहे. प्रति एकराला २० ते २४ हजार छाटणीपासून ते वांझ, शेंडे खुडण्यापर्यंत अंगावर दिले जात आहे. याचे दर सर्वाधिक असल्यामुळे द्राक्ष बागायदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. बिहारवरून दरवर्षी द्राक्ष छाटणीसाठी येणारे कर्मचारी निवडणुकीमुळे गावी गेले आहेत. यामुळे येथील मजुरांनी दर वाढविले आहेत.