शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्वास’च्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकी जपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST

ओळी : शिराळा येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'विश्वास' कारखान्यामार्फत आयाेजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन डॉ. शिमोनी नाईक यांच्याहस्ते ...

ओळी : शिराळा येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'विश्वास' कारखान्यामार्फत आयाेजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन डॉ. शिमोनी नाईक यांच्याहस्ते झाले. यावेळी राम पाटील, दत्तात्रय पाटील उपस्थित हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र रक्ताची गरज असताना 'विश्वास'च्या कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रक्तदान करून सामाजिक कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ. शिमोनी विराज नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथील चिंतन मंडपात विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे झालेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील प्रमुख उपस्थित होते. शिबिरात १२५ दात्यांनी रक्तदान केले. डॉ. नाईक म्हणाल्या, शिराळा विधानसभा मतदारसंघात आमदार मानसिंगराव यांनी मोठे सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक कार्य उभारले आहे. सार्वजनिक विकासकामे राबविण्यात ते सर्वांत पुढे आहेत. सहकारात त्यांनी आदर्श प्रस्थापित केला आहे. नाईक घराण्यातील समाजकारणाचा वसा, वारसा ते नेटाने पुढे चालवत आहेत. कोरोना महामारीच्या काळात मतदारसंघात त्यांनी उभारलेले काम, निर्माण केलेल्या सोयी-सुविधा, लोकांना केलेली मदत, घेतलेली काळजी आदर्शवत आहे. अशा सतत समाजकार्यात व्यस्त असणाऱ्या नेत्याचा वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेऊन साजरा होतो, हे आदर्शवत आहे.

कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले. डॉ नाईक यांच्याहस्ते शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सचिव सचिन पाटील, डॉ. विक्रमसिंह गावडे, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण रक्तपेढीचे डॉ. संदीप यादव, डॉ. संध्या पाखले, विवेक चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलन केले. एम. आर. पाटील यांनी आभार मानले.