शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

उद्धट कर्मचाऱ्यांना वेळीच आवर घाला

By admin | Updated: June 16, 2015 01:32 IST

जावळी पंचायत समिती सभा : शाळा परिसरात गतिरोधकाचा ठराव

मेढा : रस्त्यावर काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधींनी काही विचारले तर उद्धट उत्तर दिले त्याच्यावर काय कारवाई केली? असा प्रश्न करून अशा कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे,’ अशा कडक शब्दात पंचायत समिती सदस्य मोहनराव शिंदे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. या घटनेची नोंद सभापती सुहास गिरी यांनी घेत संबंधित कर्मचाऱ्याच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देऊन तसा ठराव सर्वानुमते करण्यात आला.जावळी पंचायत समितीची मासिक सभा बाबासाहेब आखाडकर सभागृहात सभापती सुहास गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती निर्मला कासुर्डे, सदस्य हणमंतराव पार्टे, मोहनराव शिंदे, रूपाली वारागडे, सारिका सपकाळ, कृषी अधिकारी डॉ. बागल, गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रारंभी कुडाळ येथील अपघातात निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सभेस प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावळी (मेढा)चे कर्मचारी गणेश कर्वे आढावा देण्यासाठी उभे राहिले असता सदस्य मोहनराव शिंदे यांनी ‘तुमच्या त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली किंवा त्यास या सभेस हजर करण्यास सांगितले होते त्याचे काय केले?,’ असा प्रश्न केला. त्यावर कर्वे यांनी क्षमा मागण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने सभागृहातील सदस्यांचे समाधान झाले नाही.सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असताना आणि वादावादी होत असताना सभापती सुहास गिरी यांनी कर्वे यांना कानपिचक्या देत मतभेद आमचे अंतर्गत असतील; पण असा लोकप्रतिनिधींचा अवमान झालेला आम्ही कदापि सहन करणार नाही, असे सांगून त्यांनी पवार यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव केला यावेळी वेळावेळी होणारे अपघात आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना आवर घालण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालयांच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी रूपाली वारागडे यांनी केली. त्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)