शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटी निवडणुकांचे तासगावकरांना वेध...

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

मोर्चेबांधणीस वेग : आबा-काका गटात पुन्हा संघर्ष

अमित काळे - तासगाव --विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत असतानाच, सहकाराच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर राजकारणातील सत्ताकेंद्र असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचे वेध तालुक्याला लागले आहेत. डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात काही सोसायट्यांच्या निवडणुका उरकल्या जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. आर. आर. पाटील यांनी या निवडणुकांबाबत नुकतीच काही ठराविक कार्यकर्त्यांशी चर्चाही केली.तासगाव तालुक्यात सध्या निवडणूक होणाऱ्या ३७ विकास सोसायट्या आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत त्यातल्या पहिल्या टप्प्यात २0 विकास सोसायट्यांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे, तर उर्वरित १७ सोसायट्यांच्या निवडणुका डिसेंबरनंतर दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकर्ते या प्रक्रियेमध्ये सामीलही झाले आहेत. निवडणुकांबाबत अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी, लवकरच निवडणुका होणार हे निश्चित मानले जात आहे.स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत व विकास सोसायटी या दोन प्रमुख संस्था ताब्यात घेण्यासाठी राजकीय धुरीण डाव—प्रतिडाव करीत असतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावगाडा, तर विकास सोसायट्यांच्या माध्यमातून आर्थिक नाड्या हातात ठेवण्यासाठी राजकीय गटांचे प्रमुख या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावत असतात. विकास सोसायटी सर्वसामान्य, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेल्या योजना, कर्जाबाबतची घेतलेली धोरणे राबविली जात असतात.एका बाजूला सामान्याला भांडवल उपलब्ध करून देणारी ही संस्था असली तरी, त्यावर ताबा मिळवून त्यातून आपला राजकीय गट जिवंत ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांची धडपड सुरू असते. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुका होणाऱ्या गावात मोर्चेबांधणीस सुरुवातही झालेली आहे.नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली आहे. तासगाव— कवठेमहांकाळ मतदारसंघ लक्षवेधी ठरला असल्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. कुणी कुणाचे काम केले, यावर सोसायट्यांचे पॅनेल ठरेल व पुढे निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात आ. आर. आर. पाटील व खा. संजयकाका पाटील यांचेच तुल्यबळ गट आहेत. हे दोन्ही नेते नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रथमच सोसायट्यांच्या निवडणुका होत आहेत. कुठल्या कुठल्या गावातील सोसायट्यांच्या निवडणुका आहेत, याची माहिती राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून घेतली आहे. नेत्यांच्या कानावरही हा विषय घालण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, त्याची तयारी सुरू आहे.तासगाव तालुक्यात सध्या माजी गृहमंत्री आ. आर. आर. पाटील व खा. संजयकाका पाटील यांचेच तुल्यबळ गट आहेत. विशेष म्हणजे आता दोन्ही गटांचे नेते निवडणुकीत विजयी झाल्यामुळे पदांवर आहेत. तालुक्यात सध्या ३७ विकास सोसायट्यांंच्या निवडणुका होणार आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत त्यातल्या पहिल्या टप्प्यात २0 विकास सोसायट्यांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे, तर उर्वरित १७ सोसायट्यांच्या निवडणुका डिसेंबरनंतर दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याने आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे.