अविनाश शिंदे अविवाहित असून ते सव्वा वर्षापुर्वी घरातून निघून गेले होते. गावाजवळच असणाऱ्या उसाच्या फडामध्ये हाडांच्या सांगाड्याजवळ सापडलेली चप्पल, कुजलेले कपडे, अर्धवट टॉवेल, चड्डी तसेच तंबाखूच्या पुडीवरुन अविनाश शिंदे यांचा भाऊ सुनिल शिंदे यांनी हा सांगाडा अविनाश याचाच असल्याचे ओळखले. हा हाडांचा सांगाडा उत्तरीय तपासणीसाठी पाठविणार असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगातले.
गवाशेजारी असणाऱ्या हणमंत दत्तू पवार (रा. गव्हाण ता. तासगाव) यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू होती. काम करताना शुक्रवारी दुपारी ऊसामध्ये एक मानवी कवटी व हाडाचा सांगाडा सापडला. हा सांगाडा पाहून बिहारी मजूर घाबरून गेले. त्यांनी ही माहिती मालक हणमंत पवार यांना दिली. पवार यांनी कवठमहांकाळ पोलिसात माहिती दिली. पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत गावातील लोकांची गर्दी सांगाडा पाहण्यासाठी जमा झाली होती. गावातीलच अविनाश शिंदे ५ जून २००२ रोजी घरातून निघून गेल्याचे समजले. ही माहिती त्यांच्या घरी देण्यात आली. त्याचा भाऊ सुनील शिंदे घटनास्थळी आल्यावर अविनाश शिंदे याच्या सांगाड्याची ओळख पटली. अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.