शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

‘समाजकल्याण’ची एसआयटीकडून चौकशी

By admin | Updated: May 12, 2016 00:15 IST

सहायक लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती : दीपक घाटे यांच्याकडून सह्या करण्याचा डाव शिवसेनेने उधळला

सांगली : सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील खर्चामध्ये अनियमितता आणि शिष्यवृत्ती घोटाळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एसआयटी (विशेष चौकशी पथक)ची नियुक्ती केली आहे. यामध्ये स्थानिक लेखा विभागाचे सहायक लेखाधिकारी पांडुरंग बेलेकर यांची सांगली कार्यालयाच्या चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. बेलेकर यांनी गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरु केली असून, शिष्यवृत्तीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. तसेच काही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रजेवर असलेले सहायक समाजकल्याण आयुक्त दीपक घाटे बुधवारी सकाळी कार्यालयात आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तेथून जाण्याची सूचना केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.सोलापूर जिल्ह्यातील सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला होता. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्वच सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील स्थानिक लेखा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी समिती गठित केली आहे. या समितीकडून सध्या शिष्यवृत्ती घोटाळ्यासह अन्य योजनांचीही चौकशी सुरु झाली आहे. चौकशी अधिकारी बेलेकर यांनी सोमवार, दि. ९ मेपासून चौकशी सुरु केली आहे. यामध्ये शासनाची मान्यता नसतानाही काही महाविद्यालये व काही संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नावे लाखो रूपयांची शिष्यवृत्ती वर्ग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे, तर सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयामधील अन्य योजनांच्या खर्चामध्येही गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले. चौकशी चालू असल्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती सांगण्यास नकार दिला.दरम्यान, सोलापूरच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात दोषी असलेले घाटे यांची सध्या सांगलीतील सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात नियुक्ती आहे. पण, सहा महिन्यांपासून ते रजेवरच आहेत. म्हणून त्यांच्या रिक्त जागेवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे अधिकारी सचिन कवले यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी सकाळी घाटे यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात येऊन जुन्या कागदपत्रावर सह्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेनेचे अनिल शेटे यांनी केला आहे. तुम्ही रजेवर असताना कार्यालयात कसे आलात, असा आरोप शेटे यांनी करून त्यांना कार्यालयातून जाण्यास सांगितले. यावरून कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. अखेर घाटे तेथून निघून गेल्याने गोंधळ थांबला. (प्रतिनिधी)मनमानी कारभार : अधिकाऱ्यांच्या अंगलटसांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील सामाजिक न्याय भवनमधील सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालय नोकरभरती, वसतिगृहातील जेवणाचा ठेका या प्रकरणांवरून नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. सध्याच्या सरकारने समाजकल्याण विभागाकडील आर्थिक घोटाळे बाहेर काढून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. विशेष चौकशी पथकाकडून चौकशी सुरू झाल्यामुळे घोटाळ्याचा कलंक लागलेले अनेक अधिकारी चिंतेत सापडले आहेत.