शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पेठनाक्यावर दहा लाखांची चांदी पकडली

By admin | Updated: June 16, 2016 01:18 IST

गुंडाविरोधी पथकाची कारवाई : रेंदाळ येथील एकजण ताब्यात

सांगली : बेकायदेशीरपणे चांदीची वाहतूक करणाऱ्या जितेंद्र मनोहर नाडगे (वय ४५, रा. रेंदाळ, मानेनगर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या चांदी व्यावसायिकाला बुधवारी दुपारी गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने, पैंजण व चारचाकी वाहन असे एकूण १७ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील जितेंद्र नाडगे चांदी वाहतुकीचा परवाना व दागिन्याची मूळ कागदपत्रे नसताना चांदीचे दागिने घेऊन पेठनाक्यावर येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे निरीक्षक बाजीराव पाटील यांना ारजमा करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे व अतिरिक्त पोलिस प्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी दिले होते. त्यानुसार पथकाने पेठनाका येथे सापळा रचला होता. दुपारी पावणेतीन वाजता मोटार (एमएच ०९ डीएम ४१०१) पेठनाक्यावर आल्यानंतर पथकाने गाडी थांबवून तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिकीमध्ये लपविलेले ९ लाख ८४ हजार १०५ रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व पैंजण मिळाले. पोलिस पथकाने जितेंद्र नाडगे यांच्याकडे दागिन्याबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली, पण ते या दागिन्यावरील मालकी हक्क सांगू शकले नाहीत. अखेर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दहा लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व चारचाकी वाहन असे एकूण १७ लाख ८४ हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी इस्लामपूर पोलिसांना दिले आहेत. या कारवाईत बाजीराव पाटील यांच्यासह हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे, सागर लवटे, शंकर पाटील, गुंडाबा खराडे, प्रफुल्ल सुर्वे, विमल नंदगावे, सुनील वडर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)