शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2017 00:06 IST

शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू

कोकरूड : बांबरवाडी (ता. शिराळा) येथील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली असून, याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बांबरवाडी येथील गणेश लक्ष्मण कदम (वय ११), अरुण लक्ष्मण कदम (६) व हर्षद हरिबा कदम (८) हे तीन सख्खे चुलत भाऊ बांबरवाडीच्या पश्चिमेला शेततळ्यामध्ये दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यास गेले होते. या शेततळ्याच्या एका कोपऱ्यात पाणी असल्याने गणेश व अरुण हे दोघे सख्खे भाऊ पाण्यात आंघोळीसाठी उतरले, तर हर्षद हा शेजारीच उभा होता. यावेळी अरुण हा पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेला गणेशही पाण्यात बुडाला. हे दोघे पाण्यात दिसत नसल्याने हर्षद घाबरून गेला. त्याने घराकडे धाव घेत जवळच असलेल्या गणेशच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर गणेशच्या आईसह वाडीतील लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली; मात्र गणेश व अरुण दोघेही सापडले नाहीत. मात्र त्यांचे कपडे शेजारीच असल्याने पाण्यात शोध घेतला असता शेततळ्याच्या एका बाजूला असलेल्या पाच ते सहा फूट खड्ड्यात गणेश व अरुण यांचे मृतदेह मिळून आले.याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात करण्यात आली असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे करत आहेत. (वार्ताहर)वडील मुंबईत माथाडी कामगारगणेश व अरुण हे सख्खे भाऊ असून, गणेश हा गुढे येथील कमला माधव विद्यालयात शिकत असून, त्याने सहावीची परीक्षा दिली आहे, तर अरुण हा जवळच अंगणवाडीमध्ये शिकत आहे. गणेश व अरुण यांचे वडील लक्ष्मण कदम हे मुंबई येथे माथाडी कामगार आहेत, तर आई दोन्ही मुलांसह बांबरवाडी येथे राहते. दोन्ही भावंडांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली होती.