शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST

मिरज : मिरजेत लाॅकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीमुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. विनाकारण फिरणारे नागरिक, वाहनधारकांवर पोलीस अधीक्षकांनी दंडात्मक ...

मिरज : मिरजेत लाॅकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीमुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य होते. विनाकारण फिरणारे नागरिक, वाहनधारकांवर पोलीस अधीक्षकांनी दंडात्मक कारवाई केली. शहरातील मुख्य रस्त्यावरून येणार्‍या - जाणार्‍यांना पोलीस अडवत चाैकशी करीत असल्याने वाहनधारकांना चाप बसला होता.

कोराेना संसर्ग रोखण्यासाठी शहरात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिरजेतील सर्व बाजारपेठा बंद होत्या. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरताना सापडलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली. शहरात हिरा हॉटेल चौक, शास्त्री चौक, सिद्धार्थ चौक, मिरज हायस्कूल, गाडवे चौक, सराफ कट्टा चौक, लक्ष्मी मार्केट चौकातील रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत.

पोलीस अडवत चाैकशी करीत असल्याने अंतर्गत रस्त्यावरून वाहनांची ये-जा बंद होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी पालनासाठी सर्वांना घरी बसविण्यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई सुरू केल्याने गुरुवारी रस्त्यावर शुकशुकाट होता. शनिवार पेठ, सोमवार पेठ, मार्केट हायस्कूल रोड, स्टेशन रोड परिसरात बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते गायब होते. रिक्षा व बसवाहतूक बंद होती. शहरातील रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद होते.