शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी मंडईला केले पत्र्यांनी बंदिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली शहरात होलसेल भाजी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी मंडईत भरणारा होलसेल भाजीपाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सांगली शहरात होलसेल भाजी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी मंडईत भरणारा होलसेल भाजीपाला बाजार सोमवारपासून कोल्हापूर रोडवरील फळ मार्केटला भरणार आहे. त्यामुळे येथील भाजी मंडईला पत्रे मारून बंदिस्त करण्यात आले. येथील दैनंदिन बाजार सरकारी घाटावर स्थलांतरित करण्यात आला.

रविवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने मंडईच्या दोन्ही बाजूंचे प्रवेशद्वार पत्रे लावून सील केले. त्यानंतर येथे दररोज भरणारा बाजार सरकारी घाटाजवळील मंदिर परिसरात ठरावीक अंतराने वसविण्यात आला. सोमवारपासून येथील होलसेल बाजार कोल्हापूर रोडवरील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये स्थलांतरित होणार आहे.

राज्य सरकारकडून संचारबंदीसह अनेक कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबजावणी महापालिकेकडून केली जात आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत अत्यावश्यक आस्थापनावगळता आणि शासनाने परवानगी दिलेले व्यवसायवगळता अन्य आस्थापना आणि दुकाने बंद आहेत. मात्र, शहरात दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भरणाऱ्या होलसेल भाजीपाला मार्केटमुळे गर्दी होत होती. यामुळे कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीती निर्माण झाली होती.

ही गर्दी टाळण्यासाठी होलसेल भाजी बाजारच शहराबाहेर विष्णुअण्णा दुय्यम बाजार आवारात स्थलांतरित केला आहे.

सोमवारपासून जर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कोणी भाजी होलसेलरने विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.

सरकारी घाटावर विक्रेत्यांना जागा ठरवून दिली आहे. त्यानुसार, त्यांनी मंडई वसविली आहे. मात्र, येथे विक्री करताना विक्रेत्यांनी नागरिकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी व कोरोना नियमांचे पालन करावे, अशी सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.

चौकट

फलक झळकावला

शिवाजी मंडई सील केल्यानंतर याठिकाणी महापालिकेने फलक झळकावला. बाजार भरवल्यास कारवाई करण्याचा इशारा या फलकाद्वारे देण्यात आला आहे.