शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील गटबाजीतून मिरजेत तरुणावर हल्ला

By admin | Updated: July 17, 2014 00:28 IST

दोघांविरुद्ध गुन्हा : लोखंडी गजाने डोक्यात वार

मिरज : मिरजेत शिवसेनेच्या दोन गटांतील वादातून महादेव भागोजी हुलवान (वय २३) या कार्यकर्त्यावर आज, बुधवारी लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव हुलवान व दिग्विजय ऊर्फ विजय क्षीरसागर या धनगर गल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांत वाद आहे. शिवसेनेत पद न मिळाल्याने क्षीरसागर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महादेव हुलवान याने शिवसेना उपशहरप्रमुखपदाची मागणी केल्यानंतर क्षीरसागर याने त्यास विरोध केला होता. क्षीरसागर गटाच्या संतोष बंडगर यास उपशरहप्रमुखपद मिळाल्याने हुलवान व क्षीरसागर यांच्यातील वाद विकोपाला गेला. रविवारी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकरिता इस्लामपूर येथे जाण्यासाठी क्षीरसागर व हुलवान यांच्यात बाचाबाची झाली होती. दोघांच्याही तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले होते. आज दुपारी महादेव हुलवान एमएच १० के ३०२१ क्रमांकाच्या रिक्षातून आंबेडकर उद्यानाजवळून परमशेट्टी रुग्णालयाकडे जात असताना एमएच १० एसी ७१७ क्रमांकाच्या मोटारीतून आलेल्या दिग्विजय क्षीरसागर याने रिक्षाला पाठीमागून ठोकरले. मोटारीने ठोकरल्याने रिक्षा उलटल्यानंतर दिग्विजय क्षीरसागर व त्याचा साथीदार अनिल सिध्दू हुलवान (रा. धनगर गल्ली मिरज) यांनी लोखंडी गजाने डोक्यात व पायावर वार केले. मारहाणीत महादेव हुलवान याचा पाय मोडला असून, त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महादेव हुलवान याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.