शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा भुईकोट किल्ल्यावर ऐतिहासिक नगरी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST

शिराळा : शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्यासाठी झालेला एकमेव प्रयत्न हा सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा ...

शिराळा : शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवण्यासाठी झालेला एकमेव प्रयत्न हा सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा इतिहास आहे. तो भावी पिढीला समजावा व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्ररूपी भिंती शिल्प, अश्वारूढ पुतळा अशी ऐतिहासिक नगरी उभारणार आहे. यासाठी तातडीने आराखडा पंधरा दिवसात तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. शुक्रवार, दि. १९ रोजी या किल्ल्या परिसराची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या संदर्भात मुंबई येथे बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष सुनीता निकम आदी उपस्थित होते.

आमदार नाईक यांनी म्हणाले की, मुंबई येथे ही बैठक झाली. यावेळी या इतिहास नागरी उभारणीसाठी सर्व तो निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच तातडीने आराखडा तयार करण्यासाठी आदेश दिला आहे. येथील भुईकोट किल्ला परिसर तीर्थस्थळ म्हणून विकसित करणार आहे. यामध्ये चित्ररूपी घटना दर्शवणारी भिंती शिल्प, छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, किल्ल्याची तटबंदी, कोटेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर यांची दुरुस्ती व जीर्णोद्धार करणे व धारातीर्थी पडलेल्यांची मावळ्यांची समाधी बांधणार आहे. सर्व बांधकामास आधुनिक पद्धतीने न करता ऐतिहासिक पद्धतीने करण्यात येणार आहे.