शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टी-खोत यांचा पेठनाक्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:54 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष टिपेला गेला आहे. वाळवा-शिराळ्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या पेठनाक्यावर आपल्यालाच पाठिंबा मिळावा यासाठी दोघांनी जणू ठिय्या मारला आहे. परंतु नानासाहेब महाडिक आणि त्यांच्या पुत्रांनी दोघांनाही समान अंतरावर ठेवत, दोघेही आमचेच असल्याचा दावा केला आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. वाळवा तालुक्यातील पेठनाका हे महाडिक गटाचे मुख्यालय याच मतदारसंघात येते. नानासाहेब महाडिक, त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या गटाची ताकद उल्लेखनीय असून, ते सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. शिराळा व वाळवा विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी गावात महाडिक यांचा गट कार्यरत आहे. इस्लामपूर, आष्टा शहरातही त्यांचे कार्यकर्ते आहेत. काही ग्रामपंचायतींवर त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या गटाचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुंबई-दिल्लीकडे जाता-येता राष्टÑीय महामार्गावरील पेठनाक्यावरच्या भेटी वाढवल्या आहेत.मात्र प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आपला फक्त वापरच करून घेतला आहे, अशी महाडिक यांची भावना आहे. शेट्टी यांच्या पाठीशीही महाडिक ठामपणे होते. आता मात्र त्यांच्यासमोर शेट्टी का खोत?, असा प्रश्न आहे. त्यातून त्यांनी आता स्वत:च्या पेठ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी शेट्टी आणि खोत यांना समान अंतरावर ठेवले आहे.आमदार शिवाजीराव नाईक यांचीही दोघांशी जवळीकशिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार नाईक यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात असणाºया सर्वच घटकपक्षांची व गटांची ताकद एकत्रित करून लढावे लागते. साखरसम्राटांच्या विरोधात असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही मदत त्यांना घ्यावी लागते. परंतु आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. मात्र आ. नाईक यांनी भाजपसाठी सदाभाऊ खोत यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. खोत यांच्या मदतीने मतदारसंघासाठी शासनाकडून निधी मिळवण्यावर त्यांनी भर दिला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांची मिळालेली मदत न विसरता शेट्टी यांनाही त्यांनी जवळ ठेवले आहे.