शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा उपनगराध्यक्षपदी शेरनवाब देवळे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST

फोटो -०६०७२०२१-आयएसएलएम-धैर्यशील थोरात लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शेरनवाब शमशुद्दीन देवळे यांची तर धैर्यशील विलासराव ...

फोटो -०६०७२०२१-आयएसएलएम-धैर्यशील थोरात

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शेरनवाब शमशुद्दीन देवळे यांची तर धैर्यशील विलासराव थोरात यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्ष स्नेहा माळी यांनी काम पाहिले. या निवडी ऑनलाइन करण्यात आल्या.

आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी आष्टा शहर विकास आघाडीने शेरनवाब देवळे या शिंदे गटाच्या ज्येष्ठ नगरसेवकांना पहिल्यांदा संधी दिली, तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील गटाचे स्वीकृत नगरसेवक विकास बोरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर धैर्यशील विलासराव थोरात यांना संधी देण्यात आली. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला.

निवडीनंतर राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, धैर्यशील शिंदे, पी. एल. घस्ते, अर्जुन माने, शकील मुजावर, रामचंद्र अवघडे, प्रभाकर जाधव, अ‍ॅड. अभीराजे थोरात, महेश गुरव, वैभव सांभारे, अनिल बोंडे, बाबासाहेब सिद्ध, सतीश माळी, जगन्नाथ बसुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेरनवाब देवळे म्हणाले की, दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे यांनी शहराचा सर्वांगीण विकास केला. सत्ताधारी गटाने संधी दिल्याने सर्वांना बरोबर घेऊन या काळात शहरातील विकास कामांना गती देणार आहे.

धैर्यशील थोरात म्हणाले की, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.