शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आबा-भाऊंच्या आठवणींनी शांतिनिकेतन परिसर गहिवरला

By admin | Updated: January 18, 2016 00:33 IST

माजी विद्यार्थी मेळावा : दिग्गजांच्या स्मृतींना उजाळा

सांगली : मकर संक्रांतीनंतरचा येणारा रविवार शांतिनिकेतनसाठी दरवर्षी खास असतो... शांतिनिकेतनमध्ये घडलेले आणि राज्यभर आपले कर्तृत्व सिध्द करणारे माजी विद्यार्थी हक्काने आपला रविवार शांतिनिकेतनच्या सान्निध्यात घालवत आठवणींना उजाळा देतात, मात्र यंदाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यावर दिग्गजांच्या आठवणींची झालर स्पष्टपणे दिसून आली. राज्याच्या कारभारात व्यस्त असतानाही माजी विद्यार्थी मेळावा कधीही न चुकवणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मदन पाटील यांच्या आठवणींनी रविवारी शांतिनिकेतन परिसर गहिवरला. दिवंगत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शांतिनिकेतनमध्ये अनेकांनी आपल्या कष्टाचे चीज करत आयुष्य घडविले. त्या प्रत्येकाच्या विचारसरणीवर पी. बी. सरांच्या विचारांचा प्रभाव नेहमीच दिसून येतो. आपल्या स्वच्छ प्रतिमेने राज्य कारभाराचा आदर्श निर्माण करणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील हे शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थीच. मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी आबा आपल्या जुन्या सवंगड्यांच्या सान्निध्यात थांबत असत. गेल्यावर्षीच्या माजी विद्यार्थी मेळाव्यावेळीही आबा अनुपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याने आपले आबा निश्चितपणे बरे होऊन पुन्हा आपल्या गप्पांत सामील होतील, असा विश्वास त्यांच्या मित्रांना होता, मात्र त्यांच्या निधनानंतर या रविवारी झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आबांच्या आठवणींचा गहीवर दाटून आला होता. माजी विद्यार्थी मेळाव्यात सहभागी झालेले आबांच्या आठवणीत रमून गेले होते. आर. आर. आबांबरोबरच शांतिनिकेतनच्या कार्यक्रमाचा भाग असणारे दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे मदनभाऊ पाटील. शांतिनिकेतनमधील माजी विद्यार्थी मेळाव्यासह इतर सर्व कार्यक्रमात भाऊंचा सहभाग महत्त्वाचा असायचा. आबा व भाऊंमधील मैत्रीचे दर्शनही घडत असे. अनेकदा ते वेळ काढून या मेळाव्यात बुद्धिबळाच्या पटावर रमत असत. तीन महिन्यांपूर्वी मदनभाऊंनीही आपल्यातून ‘एक्झीट’ घेतली. गेल्यावर्षी झालेल्या मेळाव्यास मदनभाऊ आवर्जून उपस्थित होते. यावर्षी आबांबरोबरच भाऊंचीही उणीव प्रकर्षाने प्रत्येकाला जाणवत होती. यंदा आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेतही पी. बी. सर, सा. रे. पाटील, आर. आर. आबा, मदन भाऊ आणि मार्इंची रांगोळी कला विश्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटली होती. ही रांगोळी पाहणारा प्रत्येकजण या दिग्गजांच्या आठवणीत रमून जात होता. (प्रतिनिधी)दिमाखदार कार्यक्रमयंदा गौतम पाटील यांनी पुढाकार घेत माजी विद्यार्थी मेळाव्याबरोबरच राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि कर्मयोगी पुरस्कार वितरणाचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. शांतिनिकेतन परिवारातील सदस्यांनी याला मोठी उपस्थिती लावत कार्यक्रम दिमाखदार केला.