शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यात प्रस्थापितांना हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST

कोरोना साथ व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २२ गावांतील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने झाली. अनेक गावात प्रस्थापितांना तरुणांनी आव्हान दिले ...

कोरोना साथ व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील २२ गावांतील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीने झाली. अनेक गावात प्रस्थापितांना तरुणांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत तरुण मंडळी सक्रिय झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. निष्क्रिय असलेल्या नेत्यांना मतदारांनी धडा शिकविल्याचे चित्र आहे. लॉकडाऊननंतर झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात नेहमीचाच जल्लोष, गावागावांत चुरस व प्रचारातील उत्साह, मोठा खर्च व कशाचीच कमतरता नसल्याचे दिसून आले. मालगावसारख्या मोठ्या गावात भाजपचेच दोन गट परस्पराविरोधात उभे ठाकल्याने येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊन सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीला महत्त्व आले आहे. एरंडोली, आरग, शिपूर यासह लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी या गावांतही मोठी चुरस झाली. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात काही गावात काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत झाली. काही गावांत राष्ट्रवादीच्या माध्यमातून जयंत पाटील यांचा गट मजबूत झाला. गावागावांतील पाणी, स्वच्छता, आरोग्य यासह मूलभूत समस्यांपेक्षा वैयक्तिक मतभेद व जिरवाजिरवीच्या राजकारणावर या निवडणुकीत भर होता.

एरंडोलीत प्रस्थापितांना धक्का देऊन नवखे उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील बड्या नेत्यांच्या सत्तेला हादरे बसले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गटाचा म्हैसाळमध्ये पराभव करून भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे गटाने एकतर्फी विजय मिळविला. मालगावातही राष्ट्रवादी नेते आप्पासाहेब हुळळे यांचे पुत्र पराभूत होऊन हुळ्ळे गटाला एकच जागा मिळाली. शिंदेवाडीत स्थानिक आघाडीने राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत केली. आमदार सुरेश खाडे यांनी १७ गावांत भाजपचे १३६ सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे. विजयनगर (म्हैसाळ) येथे भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे व राजू कोरे यांच्या गटाने सर्व नऊ जागांवर विजय मिळवीत वर्चस्व राखले. लिंगनूर येथे भाजपप्रणीत आघाडी विजयी झाली. सत्तांतर झालेल्य़ा अनेक गावांत यापुढील काळात राजकीय उलथापालथी होणार आहेत.