शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

हळदीला सात ते साडेपंधरा हजार दर

By admin | Updated: January 21, 2015 23:49 IST

सांगलीत सौद्यांना प्रारंभ : एक फेब्रुवारीपासून रोजच सौदे निघणार

सांगली : येथील मार्केट यार्डमध्ये आज (बुधवार) हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. आज दिवसभर निघालेल्या हळदीच्या सौद्यामध्ये हळदीला सात हजार ते १५ हजार ५०० प्रति क्विंटल असा दर मिळाला. आता हळदीचे सौदे १ फेब्रुवारीपासून दररोज निघणार असल्याची माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली. आज सकाळी साडेनऊच्या मुहूर्तावर गणपती जिल्हा संघामध्ये हळदीच्या सौद्यांना ज्येष्ठ हळद व्यापारी जमनादासभाई ठक्कर यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मनोहर माळी, सचिव प्रकाश पाटील, अशोक पाटील, सुनील पट्टणशेट्टी, बी. एल. पाटील, बंकटलाल मालू, उत्तम शहा यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी, अडते, हमाल, मापाडे आदी उपस्थित होते. पेड (ता. तासगाव) येथील शेतकरी रहीम शिकलगार यांनी आणलेल्या पंधरा पोती हळदीच्या सौद्यातून हळदीच्या सौद्यांना प्रारंभ करण्यात आला. त्यांची हळद पुष्पक ट्रेडिंग कंपनीचे मुकेशभाई पटेल यांनी खरेदी केली. त्यांना प्रति क्विंटल १२ हजार १११ रुपये दर मिळाला. आज दिवसभरात मार्केट यार्डमध्ये अडीचशे पोत्यांचे सौदे काढण्यात आले. यामध्ये किमान सात हजार रुपये, तर कमाल १५ हजार ५०० रुपये दर मिळाला. आज साडेपंधरा हजार रुपये मिळालेला दर हा गेल्या वर्षभरातील उच्चांकी दर आहे. साडेपंधरा हजार रुपयांना एकाच क्विंटलची विक्री झाली. आज हळद सौद्यांना प्रारंभ झाला असला तरी, प्रत्यक्षात १ फेब्रुवारीपासून हळदीच्या सौद्यांना नियमितपणे सुरुवात होणार आहे. १ तारखेपासून हळदीचे सौदे आता सोमवार ते शनिवार असे दररोज निघणार आहेत. यावर्षी हळदीची आवक चांगली होणार असून यंदाच्या हंगामात बारा ते तेरा लाख पोत्यांची आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. सांगलीमध्ये हळदीचा हंगाम आता जूनअखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वजनाची मर्यादा-- आजपासून हळद पोत्यांवर वजनाची मर्यादा घालण्यात आली आहे. मार्केट यार्डमध्ये हळदीचे पोते ७० किलोच्या वर न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मनोहर सारडा यांनी दिली. अडत्यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आज सौद्यांना प्रारंभ झाल्यामुळे ७० किलोवरील पोती स्वीकारण्यात आली. यापुढे शेतकऱ्यांना याची कल्पना देण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्याचेही आवाहन केले आहे.