शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

जिल्ह्यात सात दुय्यम निबंधक, विवाह नोंदणी कार्यालये बंद

By admin | Updated: December 1, 2015 00:13 IST

कोटीचे नुकसान : विलासराव जगताप यांची कारवाईची मागणी

जत : जतसह सांगली जिल्ह्यातील सात दुय्यम निबंधक व विवाह नोंदणी कार्यालये मागील चार दिवसांपासून बंद आहेत. प्रत्येक दिवशी सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. कार्यालय बंद ठेवणारे आणि बंद करण्याचा आदेश देणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांकडून झालेली नुकसानभरपाई शासनाने वसूल करावी, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.जिल्ह्यातील तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, कडेगाव, जत, कुपवाड येथील कार्यालये मागील चार दिवसांपासून बंद आहेत. तेथील नोंदणी अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामासाठी सांगली येथे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही अथवा प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था करून कार्यालय सुरू ठेवले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून किंवा परगावाहून खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली आहे.प्रत्येक कार्यालयाकडून प्रति दिवस सरासरी एक ते दीड लाख रुपये व सात कार्यालयाचे एकत्रित मिळून सुमारे एक कोटी रुपये उत्पन्न शासनाला मिळत आहे. कार्यालय बंद ठेवून कार्यालयाला कुलूप लावल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीस सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या अधिकारात या सर्व अधिकाऱ्यांना सांगली येथे थांबून काम करण्याचे आदेश दिले आहेत, असेही जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)चौकशी करा..!---सांगली जिल्ह्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली येतात. परंतु त्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता व त्यांचा लेखी आदेश नसताना आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात त्यांना सांगली येथे कामासाठी ठेवून घेतले आहे. बेकायदेशीररित्या कार्यालयास कुलूप लावून कार्यालय बंद ठेवणे व नागरिकांची गैरसोय करणे आणि शासनाचे आर्थिक नुकसान करणे या गंभीर घटना आहेत. याप्रकरणी संबंधितांची शासनाने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली.