शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील व्यापाऱ्यांना सेवा कराच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:19 IST

सांगली : कमिशनवर व्यवसाय करणाºया सांगलीतील हजार व्यापाºयांना जीएसटी कार्यालयाने सेवा करासंदर्भात नोटीस बजाविली आहे. २०१२ ते २०१६ या चार वर्षांतील आर्थिक ताळेबंद सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. चेंबर आॅफ कॉमर्सने मात्र कागदपत्रे सादर करण्यास नकार दिला आहे. मार्केट यार्डातील व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारित व्यवसाय करीत असल्याने सेवा ...

सांगली : कमिशनवर व्यवसाय करणाºया सांगलीतील हजार व्यापाºयांना जीएसटी कार्यालयाने सेवा करासंदर्भात नोटीस बजाविली आहे. २०१२ ते २०१६ या चार वर्षांतील आर्थिक ताळेबंद सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. चेंबर आॅफ कॉमर्सने मात्र कागदपत्रे सादर करण्यास नकार दिला आहे. मार्केट यार्डातील व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारित व्यवसाय करीत असल्याने सेवा कर बंधनकारक नसल्याचा पवित्रा घेतला आहे.जीएसटी कार्यालयाने गेल्या आठवड्यात कमिशन एजंट असलेल्या व्यापाºयांकडे सेवा कराबाबत ताळेबंदाचे मागणीपत्र पाठविले आहे. तीन दिवसांत चार वर्षातील ताळेबंद सादर करण्यास सांगितले आहे. सांगलीतील मार्केट यार्डात शेतीमालाची खरेदी-विक्री कमिशनवर करणाºया व्यापाºयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जीएसटी कार्यालयाच्या मागणीपत्रामुळे मार्केट यार्डातील व्यापाºयांत खळबळ उडाली होती. शेतीमालाला सेवा कर लागू नसल्याचा दावा व्यापारी वर्गाकडून केला जात आहे. त्यात तीन दिवसांत ताळेबंद कसा सादर करायचा, असा प्रश्नही व्यापाºयांसमोर आहे. मार्केट यार्ड वगळता काही व्यापाºयांनाही मागणीपत्र मिळाले असल्याचे सांगण्यात आले. सेवा कराच्या मागणीला चेंबर आॅफ कॉमर्सने विरोध दर्शविला आहे. याबाबत चेंबरने जीएसटी कार्यालयाकडेही भूमिका मांडली आहे. मार्केट यार्डातील बहुतांश व्यापारी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शेतीमाल शासकीय गोदामात ठेवल्यास त्यास सेवा कर लागू नाही आणि हाच शेतीमाल शीतगृहात ठेवल्यास मात्र सेवा कर लागू आहे. हा शासनाचा दुजाभाव आहे. शासकीय गोदामापेक्षा शीतगृहात शेतीमाल जादाकाळ टिकतो. त्याचा फायदा शेतकºयांना होतो, असा दावा व्यापारी करीत आहेत.वाद चिघळण्याची चिन्हेमार्केट यार्डातील व्यापार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारित केला जातो. त्यामुळे सेवा कराची मागणी जीएसटी कार्यालयाने बाजार समितीकडे करावी, असा पवित्राही चेंबर आॅफ कॉमर्सने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात सेवा कराचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.