शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गायब फायलीचे रहस्य आणखी गडद

By admin | Updated: January 12, 2016 00:42 IST

अजूनही पत्ता नाही : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांत कलगीतुरा रंगला

सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील दोन एकर जागेवरील प्ले ग्राऊंडचे आरक्षण उठविण्यासंदर्भातील फाईल पाच दिवसांपासून गायब आहे. अजूनही या फायलीचा पत्ता लागलेला नाही. नगररचनाकारांनी संबंधित फाईल महापौरांकडे असल्याचा खुलासा केल्याचा दावा विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला, तर महापौरांनी सूर्यवंशी यांचा दावा फेटाळत, ही फाईल आपल्याकडे नसल्याचे सांगितले. या प्रकाराने गायब फायलीचे रहस्य आणखीनच गडद होत आहे. कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या मागील बाजूस महापालिकेच्या दहा एकर भूखंडावर प्ले ग्राऊंडचे आरक्षण आहे. सध्या हा भाग रहिवासी क्षेत्रात समाविष्ट झाला असला तरी, काही भाग अजूनही हिरव्या पट्ट्यात आहे. महापालिकेने काही मालमत्ताधारकांना गुंठेवारी नियमितीकरणांतर्गत प्रमाणपत्रेही दिली आहेत. आता प्ले ग्राऊंडच्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा ठराव करण्यात आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यासाठी नगरसेवकांचे खिसे गरम करण्यात आले आहेत. हे आरक्षण उठविण्यास काही नगरसेवकांनी विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. या नगरसेवकांनी आरक्षणासंदर्भातील फायलीची नगररचनाकडे मागणी केली. पण गेले पाच दिवस नगररचना विभागाने फाईल देण्यास टाळाटाळ केली आहे. कधी महापौरांच्या, तर कधी उपायुक्तांच्या कस्टडीत ही फाईल असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी नगररचनाकार काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून फायलची मागणी केली. त्यावर त्यांनी माझ्याकडे फाईल नसून ती महापौरांकडे असल्याचे सांगितले. सूर्यवंशी यांनी दूरध्वनीवरील संभाषणच पत्रकारांना ऐकविले. याबाबत महापौर विवेक कांबळे यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, त्यांनी सूर्यवंशींचा दावा फेटाळला. महासभेत आरक्षण उठविण्याचा कोणताही ठराव झालेला नाही. संबंधित फाईलही माझ्याकडे नाही. त्यामुळे मी या विषयावर अधिक काय सांगणार, अशी बाजू त्यांनी मांडली. महापौर व विरोधी पक्षनेत्यांत फायलीवरून कलगीतुरा रंगला असला तरी, ही फाईल नेमकी कुठे आहे? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. आयुक्तांकडून ही फाईल उपायुक्तांकडे गेल्याचे काहीजण सांगतात, तर काहीजण महापौरांकडे बोट दाखवितात. (प्रतिनिधी)कोल्हापूर रस्त्यावरील आरक्षित भूखंडाबाबत आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही. महासभेतही असा कोणताही ठराव झालेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे उचित राहणार नाही. आपणही या भूखंडाबाबत वृत्तपत्रातून वाचले आहे. आयुक्तांनी आरक्षण उठविण्यास मान्यता दिल्याचे बातमीतून समजले. ही फाईल माझ्याकडे आल्यानंतर त्यावर अभ्यास करून निर्णय घेऊ. - विवेक कांबळे, महापौरनगररचनाकडे फायलीची मागणी केली, पण त्यांनी अद्याप ती दिलेली नाही. ही नगररचनाकारांची बेफिकिरी आहे. त्यांच्याकडून फाईल गायब होते. याबाबत नगरविकास विभाग व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन ठराव मंजूर न करण्याची विनंती केली आहे. महासभेतही अशा ठरावाला आम्ही विरोध करू - दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते