शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅनचालक आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

--------------- कार्यालयांतील सॅनिटायझर मशीन बंद सांगली : मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात सॅनिटायझर मशीन बसविण्यात आली होती. ...

---------------

कार्यालयांतील सॅनिटायझर मशीन बंद

सांगली : मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात सॅनिटायझर मशीन बसविण्यात आली होती. मात्र हा संसर्ग कमी झाल्यानंतर ही मशीन बंद पडली. आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढली आहे; मात्र तरीही काही शासकीय कार्यालयांतील सॅनिटायझर मशीन बंदच आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

------------

कुत्र्यांच्या झुंडी

सांगली : शहरात जागोजागी कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत. या झुंडीतील श्वान वाहनधारकांवर हल्ला करताना पाहायला मिळत आहेत. रस्त्याने चालणाऱ्या लोकांना देखील या सर्वांचा त्रास सोसावा लागत आहे. पालिकेने याबाबत डोळे झाकून घेतले आहेत.

-------------------

ई-सेवेबाबत प्रशिक्षण शिबिर

सांगली : आजचे युग हे डिजिटल युग आहे. सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षण संदर्भात कोणत्याही प्रशिक्षण संस्था नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.

-------------------

धूर फवारणी करण्याची मागणी

शिराळा : शहरातील काही वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

----------------

वाहनधारक बिनधास्त

मिरज : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. तरीही काही वाहनधारक बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहे. कोरोनाची कोणतीही भीती त्यांना नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

-----------------

उकाड्याने केले हैराण

आटपाडी : सध्या तापमानाचा पारा वाढू लागला आहे. उन्हाच्या कडाक्याबरोबरच घामाच्या धारांनी नागरिकांना असह्य केले आहे. घशाला कोरड कायम पडलेली आहे. एप्रिल महिन्यातील उष्मा त्रासदायक होत असून, सध्या कोरोनामुळे शीतपेय पितानाही नागरिकांना भीती वाटत आहे.

-------------

फिरत्या विक्रेत्यांचे नुकसान

कडेगाव : सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, फळ तसेच रस विक्रेते यांनाही आता रस्त्यावर विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच ठप्प झाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

------------------

उद्यानांमध्ये शुकशुकाट

सांगली : सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणांवरही बंदी आणली आहे. त्यामुळे आता उद्याने बंद आहेत. बालके सध्या घरात बसून कंटाळली असली, तरी त्यांना उद्यानात जाता येत नाही. मुलांअभावी या उद्यानात सध्या शुकशुकाट पसरला आहे.