शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सत्यजित देशमुखांचे ‘त्या’ ४८ गावांत लक्ष

By admin | Updated: June 18, 2015 00:39 IST

‘गाव तेथे कार्यकर्ते’ धोरण : नवीन फळी उभारून काँग्रेस सक्षम करण्यावर भर

कासेगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी वाळवा तालुक्यातील ४८ गावात काँग्रेसचा गट मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्या-त्या गावातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांत समेट घडवून आणला जात आहे. गाव तेथे कार्यकते हे धोरण अवलंबले जात असून, एकंदरीत या धोरणामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.गत विधानसभा निवडणुकीमध्ये शिराळा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना वाळवा तालुक्यातील ४८ गावातून १८ हजार इतके मतदान झाले होते, तर याउलट मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांना जवळपास ४० हजार इतके मतदान झाले होते. शिवाजीराव नाईक हे तर या गावातील मतदानावरच विजयी झाले आहेत. मात्र सत्यजित देशमुख यांना या तालुक्यातील ठराविक गावातूनच बऱ्यापैकी मतदान झाले होते. त्यामुळे त्यांच्या झालेल्या पराभवासाठी वाळवा तालुक्यातील पडलेले कमी मतदान हे एक प्रमुख कारण होते.त्यामुळे ही चूक सुधारुन सत्यजित देशमुख यांनी आता गावा गावात नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधत गट पुनर्बांधणीस सुरुवात केली आहे. त्यामध्ये कासेगावातून अ‍ॅड. बी. डी. पाटील, ज्ञानदेव पाटील, कृष्णा माळी, जयदीप पाटील, वाटेगाव येथून गणपत पाटील, प्रदीप शिंदे, अतुल पाटील, काळमवाडी येथून सुनील सावंत, नेर्ले येथून जयकर कदम, किरण थोरात, तांबवे येथून शंकर तोडकर, दादा पाटील, ऐतवडे बुद्रुक येथून प्रताप घाटगे, बाबा गायकवाड, ऐतवडे खुर्द येथून जोश्नाताई पाटील, तांदुळवाडी येथील प्रवीण पाटील, सतीश पाटील, येडेनिपाणी येथील आनंदा पाटील तसेच कामेरी, येलूर, इटकरे,भाटवाडी, पेठ, सुरुल, रेठरेधरण आदी गावातही जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण केले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही रिचार्ज झाले आहेत. एकंदरीत साडेतीन वर्षानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देशमुख यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण आहे. (वार्ताहर)‘सुपर पॉवर...’वाळवा तालुक्यातून नेहमीच शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी असणारी ही ४८ गावे नाईकांच्या विजयात ‘सुपर पॉवर’ म्हणून ओळखली जातात. येथे आता सत्यजित देशमुखांनी लक्ष घातले असून, कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमात ते न चुकता हजेरी लावत आहेत. एकूणच त्यांचे कार्यकर्त्यांची नवीन फळी तयार करण्यासाठी प्रयत्न आहेत.