शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीतील चहा विकणारा संतोष झाला सीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : सलग बारावेळा अपयश येऊनही न डगमगता सीए उत्तीर्ण होणाऱ्या येथील चहा विक्रेत्याने आदर्श निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी : सलग बारावेळा अपयश येऊनही न डगमगता सीए उत्तीर्ण होणाऱ्या येथील चहा विक्रेत्याने आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या जिद्दीला आटपाडी तालुका सलाम करत आहे. संतोष नामदेव बालटे हे त्याचे नाव.

आटपाडीला महावितरण कार्यालयासमोर संतोषचे वडील नामदेव बालटे यांचे चहाचे दुकान आहे. वडिलांना चहा विकत असताना मदत करत सीए होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या संतोषने सहा वर्षात बारावेळा सीएच्या परीक्षा दिल्या. बारा वेळा यशाने त्याला हुलकावणी दिली. अखेरच्या प्रयत्नात मात्र संतोषने यशाला गवसणी घालत सीए होण्याचे स्वप्न साकरलेच, शिवाय आईवडिलांच्या कष्टाचे पांग फेडले.

सध्या संतोषचे वडील नामदेव बालटे व भाऊ दीपक चहाचा व्यवसाय करत आहेत. मोठे भाऊ उत्तम बालटे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. अत्यंत साधी राहणी व प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी कष्टाने मुलांना वाढवले आहे. कष्ट करण्याची तयारी हा संतोषचा अंगभूत गुण. शाळेत हुशार असणारा संतोष चहाचे कप धुताना आयुष्याची स्वप्ने बघत होता.